अमेरिकेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विमान उड्डाणांवर परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाऊनचा व्यापक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील हवाई वाहतूक केंद्रात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या उड्डाणांना काही काळासाठी थांबवावे लागले. या कारणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ आणि घबराट पसरली. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए)ने याबाबत माहिती देताना सांगितले की, शिकागो, वॉशिंग्टन आणि नेवार्क (न्यू जर्सी) येथील विमानसेवाही कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे उशिराने सुरू आहेत.


अमेरिकेचे परिवहन मंत्री सीन डफी यांनी अंदाज वर्तवला आहे की, पुढील काही दिवसांत आणखी अनेक उड्डाणे उशिरा होतील किंवा रद्द करावी लागतील, कारण देशातील हवाई वाहतूक नियंत्रकांना संघीय सरकारच्या ‘शटडाऊन’ काळात वेतनाशिवाय काम करावे लागत आहे. सीन डफी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, “अनेक नियंत्रक आजारी असल्याचे सांगत आहेत, कारण वेतन न मिळाल्यामुळे आर्थिक ताण वाढला आहे आणि आधीच अवघड असलेले त्यांचे काम आणखी तणावपूर्ण झाले आहे.” दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षाने म्हटले आहे की, जोपर्यंत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प स्वतः हस्तक्षेप करत नाहीत, तोपर्यंत या समस्येचे निराकरण शक्य नाही. सध्या अमेरिकेतील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.


शटडाऊनमुळे सामान्य नागरिकांचे जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अमेरिकेतील मेरीलँड, कॅलिफोर्निया, अ‍ॅरिझोना आणि टेक्सस यांसारख्या शहरांमध्ये हजारो लोक मोफत अन्नासाठी फूड बँकसमोर तासनतास रांगेत उभे आहेत. शटडाऊनमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थांबले आहेत, त्यामुळे त्यांच्या हातात ना पैसा उरला आहे ना निश्चित नोकरी. आता स्थिती इतकी बिकट झाली आहे की, फूड बँकांमध्येही अन्नाची टंचाई निर्माण झाली आहे. अमेरिकेत शटडाऊन १ ऑक्टोबरपासून सुरू झाला, जेव्हा डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी अल्पकालीन आर्थिक सहाय्याच्या प्रस्तावाला नकार दिला आणि मागणी केली की त्या विधेयकात ‘अफोर्डेबल केअर अॅक्ट’अंतर्गत आरोग्य विम्यासाठी संघीय अनुदानाचा विस्तार समाविष्ट केला जावा. सध्या शटडाऊनचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम दिसत आहे आणि सामान्य जनता त्याचा सर्वाधिक फटका सहन करत आहे.

Comments
Add Comment

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर

‘मोंथा’ चक्रीवादळाचा इशारा; ५ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता

दिल्ली: आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावरुन मोंथा चक्रीवादळ पुढे सरकत आहे. पुढील २४ तासांच्या आत २८