Thursday, January 29, 2026

आदित्य ठाकरेंनी 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये!

आदित्य ठाकरेंनी 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये!

मतदार याद्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; राहुल गांधींसारखे 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला'

मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये "घोळ" झाल्याचे पुराव्यांसह मांडले होते. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, "आदित्य ठाकरेंनी मी 'महाराष्ट्राचा पप्पू' आहे, असे प्रदर्शन करू नये. मी त्यांना 'महाराष्ट्राचा पप्पू' म्हणणार नाही, पण त्यांनी राहुल गांधी बनू नये, अशी माझी अपेक्षा आहे."

ते पुढे म्हणाले, "राहुल गांधी जसे मोठी स्क्रीन लावतात, येरझाऱ्या घालतात, पण त्यातून 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला' असेच घडते. आदित्य ठाकरेंनी हेच केले आहे."

आदित्य ठाकरेंनी जे मुद्दे उपस्थित केले, त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिलेली आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment