Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरु होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने एक पर्यायी पादचारी पूल नागरिकांसाठी खुला केला आहे. त्यामुळे स्थानिकांना पूर्व - पश्चिमकडे ये - जा करणे सोपं होईल. तर जुना उड्डाणपूल हा येत्या ३ महिन्यात पाडण्यात येणार आहे. व त्यानंतरच नवीन उड्डाणपुलाचे काम सुरु होणार आहे.

शीव रेल्वे उड्डाणपुलाच्या पाडकामातील अडथळा आता दूर झाला आहे. मध्य रेल्वेने पर्याय म्हणून एक पादचारी पूल उभारला असून तो लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे उड्डाणपुलाचे उर्वरित पाडकाम सुरु होणार असून येत्या तीन महिन्यात उड्डाणपूल जमीनदोस्त केला जाईल.

पूर्वी शीव उड्डाणपूल बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. वाहनचालक आणि पादचाऱ्यांना लांबचा वळसा घ्यावा लागत होता. पुलाच्या परिसरात शाळा, महाविद्यालय आणि रुग्ण्यालाय असल्याने, पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी संपूर्ण पूल पाडण्यास तीव्र विरोध दर्शवला होता .

स्थानिक आणि इतर पादचाऱ्यांसाठी ५६ मीटर लांब आणि ३ मीटर रुंद असा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. हा पूल आता पूर्ण झाला असून, स्थानिकांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितलं की , "शीव रेल्वे उड्डाणपुलाच्या धारावी दिशेकडील पादचारी पुलामुळे प्रवाशांना पूर्व - पश्चिमकडे ये जा करण्यासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.

उड्डाणपुलाच्या दोन मार्गिकेपैकी एक मार्गिका स्थानिकांना ये- या करण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. आता पादचारी पूल खुला झाल्याने दुसऱ्या मार्गिकेचे तोडकाम सुरु करण्यात येत आहे. जानेवारी २०२६ अखेर पूलाचे बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >