स्वप्नील जोशी आणि मुक्त बर्वेची जोडी पुन्हा एकत्र ; ‘मुंबई पुणे मुंबई ४’ ची घोषणा!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय रोमँटिक फ्रँचायजींपैकी एक असलेला चित्रपट ‘मुंबई पुणे मुंबई’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्त बर्वे या सुपरहिट जोडीने त्यांच्या सोशल मीडियावरून ‘मुंबई पुणे मुंबई ४’ ची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.


सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओमुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये लिहिलं आहे...


“१५ वर्षांपूर्वी सुरु झालेला एक रोमँटिक प्रवास आता नव्या वळणावर येतोय... ती सध्या काय करते, प्रेमाची गोष्ट, ऑटोग्राफ, अशा सगळ्या प्रेममय कथानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडे पुन्हा एकदा घेऊन येत आहेत प्रेमाची नवी गोष्ट तीही तुमच्या आवडत्या जोडीसोबत, स्वप्नील जोशी आणि मुक्त बर्वे.”


या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्थातच सतीश राजवाडे करत असून, निर्मिती संजय छाब्रिया आणि अमित भानुशाली हे करणार आहेत.


‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटाचा पहिला भाग १५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि तो मराठी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात गोड रोमँटिक चित्रपटांपैकी एक ठरला. त्यानंतर ‘मुंबई पुणे मुंबई २’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई ३’ यांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत चाहत्यांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली.


आता या चित्रपटाचा चौथा भाग जाहीर झाल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत ही पहिलीच चित्रपट फ्रेंचायजी ठरते आहे ज्याचा चौथा भाग प्रदर्शित होणार आहे आणि हेच या चित्रपटाचं विशेष वैशिष्ट्य आहे.


सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला असून, “ही जोडी परत एकदा जादू निर्माण करणार” अश्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.


‘मुंबई पुणे मुंबई ४’ नेमका कधी प्रदर्शित होणार, याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही; पण या घोषणेनेच चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

Comments
Add Comment

‘धुरंधर’चा रनटाईम १८५ मिनिटे ? रणवीरच्या कारकिर्दीतील सर्वात लांब चित्रपट

मुंबई : धुरंधरच्या ट्रेलरने सध्या प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. हा ट्रेलर १२ नोव्हेंबर रोजी लाँच

बॉलीवूडचे खलनायक प्रेम चोप्रांची तब्येत स्थिर, लीलावती रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रा यांची तब्येत बरी नव्हती. वयानुसार

'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने