पनवेल : सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये तरुणीने आत्महत्या केली. पनवेलमध्ये १८ वर्षांच्या तरुणीने इमारतीच्या १० व्या मजल्यावरुन उडी टाकून आत्महत्या केली.
तरुणीने आत्महत्या केली त्यावेळी तिच्या घरात ती सोडून इतर कोणीही नव्हते. बाहेरून घरी आलेल्या तरुणीने १० व्या मजल्यावर जाऊन तिथून थेट खाली उडी मारली आणि स्वतःचे आयुष्य संपवले.
आत्महत्या करणारी तरुणी पनवेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. या तरुणीने टोकाचा निर्णय का घेतला हा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.






