Wednesday, November 19, 2025

ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर ‘कांतारा- चैप्टर 1’ या तारखेला दिसणार ओटीटीवर!

ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर ‘कांतारा- चैप्टर 1’ या तारखेला दिसणार ओटीटीवर!

मुंबई : ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा- चैप्टर 1’ आता लवकरच ओटीटीवर येणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये जोरदार कमाई करत आहे आणि प्रदर्शित झाल्यानंतर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. निर्मात्यांनी अधिकृत घोषणेद्वारे सांगितले आहे की हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ पासून प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. तसेच प्रेक्षक कांतारा- चैप्टर १ कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत पाहू शकतील.

२०२२ मध्ये आलेला मूळ चित्रपट “कांतारा” ब्लॉकबस्टर ठरला होता. आता त्याचा प्रीक्वल “कांतारा: अ लेजेंड: चॅप्टर १” प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. नव्या चित्रपटांच्या पार्श्वभूमीवरही, “कांतारा: अ लेजेंड: चॅप्टर १” प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळव आहे.

चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन आठवड्यांत जबरदस्त कलेक्शन केला आणि चौथ्या आठवड्यातही चांगला नफा कमावला. भारतात बॉक्स ऑफिसवर २५ दिवसांत या चित्रपटाने ५८९.६० कोटी रुपये मिळवले असून, जागतिक पातळीवर ८१३ कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने कमावला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >