Monday, October 27, 2025
Happy Diwali

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारण सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारण सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

मुंबई: बिग बॉस मराठी ४ मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तेजस्विनीचा साखरपुडा झाला आहे. तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांच्या नात्याबद्दल तेजस्विनीने याआधी समाजमाध्यमांवर कोणतीच पोस्ट केली नव्हती. मात्र आता साखरपुड्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकल्यामुळे तेजस्विनीच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

तेजस्विनीने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तर समाधान सरवणकर हे शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत. सदा सरवणकरांप्रमाणे त्यांचे ज्येष्ठ पुत्र समाधान सरवणकर सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे कलाकार विश्वातील अभिनेत्री आता राजकीय घराण्याची सून होणार आहे.

तेजस्विनीच्या साखरपुड्याच्या फोटोंमुळे आता ती लग्नबंधनात कधी अडकणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. साखरपुड्यासाठी तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांनी पारंपरिक लूक केला होता. लाल रंगाची डिझायनर साडी, गळ्यात मोठा हार, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा या लूकमध्ये तेजस्विनी अतिशय सुंदर दिसत होती. तर समाधान सरवणकर यांनी मोती रंगाचा जोधपुरी सूट घातला होता. त्यांच्या साखरपुड्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >