नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि प्रेरणादायी योगदानाचा देशातील सर्वोच्च सन्मान म्हणून दिले जाणारे २०२५ या वर्षासाठीचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार केंद्र सरकारने रविवारी घोषित केले. या पुरस्कारांमधून राष्ट्रीय विकासासाठी वैज्ञानिक उत्कृष्टता आणि तांत्रिक नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची केंद्र सरकारची वचनबद्धता अधोरेखित होते.
सर्वोच्च 'विज्ञान रत्न' नारळीकरांना (मरणोत्तर) यंदाच्या पुरस्कारांमध्ये देशातील सर्वोच्च सन्मान असलेल्या 'विज्ञान रत्न' पुरस्काराने ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना (मरणोत्तर) सन्मानित करण्यात आले आहे.






