नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागडे पदार्थ खरेदी करण्याआधी एक अभिनव युक्ती केली. पैशांची बचत करण्यासाठी महिलेने भन्नाट आयडिया केली. तिने फ्लाईटच्या आधी आवश्यक सामान आणि स्नॅक्ससाठी ब्लिंकिट (Blinkit) वर ऑर्डर केली. जे फक्त 10 ते 15 मिनिटात विमानतळावर डिलिव्हर झालं. महिलेची ही जबरदस्त ट्रीक प्रवाशांसाठी हा एक सोपा , वेगवान आणि चांगला पर्याय ठरू शकते.
विमानतळावर नेहमीच लांब रस्ता, व्यस्त टर्मिनल्स आणि महाग खाण्याचे पदार्थ असतात. हे पदार्थ अनेकांना परवडत नाहीत. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एकवर लेओवर दरम्यान या महिलेनं फ्लाईटच्या आधी गरजेचं सामान घेण्याचा सोपा उपाय शोधला. त्यानंतर जे झालं..त्या गोष्टीकडे सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. महिला प्रवाशाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, तुम्ही एअरपोर्टवर 1000 रुपयांचे स्नॅक्स खरेदी करणे टाळू शकता. कारण तुम्हाला आताच समजलं असेल की, तुम्ही दिल्ली एअरपोर्टच्या आतमध्येही ब्लिंकिटने ऑर्डर करू शकता.
View this post on Instagram
या व्हायरल पोस्टमध्ये महिला प्रवाशाने म्हटलंय, मी ग्वालियरहून सिंगापूरला जात होती. दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल 1 कडे माझं काही तासांचं लेओवर होतं. मी टर्मिनल वर जशी पोहोचली, मला कळलं की मी माझे स्नॅक्स आणि पर्सनल केअरच्या गोष्टी पॅक करणं विसरले. माझी फ्लाईट रात्री होती. तेव्हा मी विचार केला की, ब्लिकिंटने ऑर्डर करू शकते. मी बाहेर येऊन ब्लिकिंट अॅपवर माझं करन्ट लोकेशन टाकलं. त्यानंतर ब्लिकिंट ऑर्डर घेऊन थेट एअरपोर्टच्या आतमध्ये आलं. 10-15 मिनिटांच्या आत मला माझ्या आवश्यक सर्व गोष्टी मिळाल्या.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका यूजरने म्हटलंय, भारतातील या डिलिव्हरी सेवा खूप पसंत आहेत. 15-20 मिनिटांत तुम्ही काहीही ऑर्डर करू शकता. दुसऱ्या यूजरने म्हटलं, स्नॅक्स पॅक करायची गरज काय..जेव्हा ब्लिंकिट तुमच्यासोबत आहे. एका व्यक्तीने मजेशीर कमेंट करत म्हटलं, आता एअरपोर्टवर विचारावं लागणार नाही की, हे दहा रुपयांचं बिस्किटचं पॅकेट किती रुपयांचं आहे.






