Monday, October 27, 2025
Happy Diwali

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त आहेत. वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (देवशपनी) ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. वावर्षी भागवत एकादशीनोव्हेंबरला आहे. द्वादशीला श्रीकृष्ण यांच्याशी तुळशीचा विवाह लावण्यात येतो. तेव्हापासून वैवाहिक मुहूर्त काढले जाण्याची परंपरा आहे. यावर्षी तुळशीचा विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी बुधवार, २ नोव्हेंबरपासून, कार्तिक

पौर्णिमा शुक्रवार, ५ नोव्हेंबरपर्यंत करावयाचा आहे. त्यानंतर माणसांच्या विवाह सोहळ्यांना प्रारंभहोईल. डिसेंबर २०२५ मध्ये लग्नासाठी ४, ५ आणि ६ डिसेंबर या तीन शुभ तारखा आहेत.  जानेवारी २०२६ या महिन्यात शुक्र ग्रहाच्या दहनामुळे आणि इतर प्रतिकूल घटकांमुळे लग्नासाठी शुभ मुहूर्त नाही. त्यामुळे, लग्न करण्यासाठी हा काळ शुभ नाही. फेब्रुवारी २०२६ मध्ये ५, ६, ८, १०, १२, १४, १९, २०, २१, २४, २५ आणि २६ या दिवशी विवाह मुहूर्त आहेत. मार्च हा एक संक्रमणकालीन महिना म्हणून ओळखला जातो, जो उबदार वसंत ऋतूचे स्वागत करतो आणि हिवाळ्याला निरोप देतो.

मार्च २०२६ मध्ये २, ३, ४, ७, ८, ११, १२ रोजी विवाह मुहूर्त आहेत. एप्रिल हा फुलांचा महिना, जेव्हा वसंत ऋतू त्याच्या शिखरावर असतो. या महिन्यात १५, २०, २१, २५, २७, २८ आणि २९ तारखेला विवाह मुहूर्त आहेत. मे २०२६ मध्ये हिंदू पंचांगामध्ये लग्नासाठी ८ शुभमुहूर्त आहेत. त्यात १, ३, ५, ६, ७, ८, १३ आणि १४ मे २०२६ या तारखांचा समावेश आहे. जून २०२६ महिन्यात २१, २२, २३, २४, २५, २६, २७ आणि २९ जून २०२६ या ८ तारखांना लग्नाचे मुहूर्त असल्याचे हिंदू पंचांगामध्ये नोंद आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा