Monday, October 27, 2025
Happy Diwali

पोलिसांनी तरुणीसह आरोपींच्या फोनचे CDR काढले, हाती आली 'ही' माहिती

पोलिसांनी तरुणीसह आरोपींच्या फोनचे CDR काढले, हाती आली 'ही' माहिती

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा तपास पोलीस करत आहेत. या तपासाचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेतली. या भेटीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी आत्महत्या करणारी डॉक्टर तरुणी तसेच आरोपी पीएसआय गोपाल बदने आणि आरोपी प्रशांत बनकर या तीन जणांच्या फोनचे सीडीआर काढले आहेत. यातून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. जानेवारी ते मार्च या काळात डॉक्टर तरुणी गोपाळ बदनेच्या संपर्कात होती नंतर ती प्रशांत बनकरच्या संपर्कात होती. पोलीस आता जानेवारी ते मार्च काळातील डॉक्टर तरुणी आणि पीएसआय गोपाल बदने या दोघांची लोकेशन जाणून घेत आहेत. दोघे कधी एकत्र एकाच लोकेशनवर होते का याचाही तपास केला जाणार आहे. न्यायालयाने प्रशांत बनकरला २८ ऑक्टोबरपर्यंत आणि बदनेला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस दोन्ही आरोपींची सखोल चौकशी करत आहेत. डॉक्टर तरुणीचा पोस्टमॉर्टिम रिपोर्ट लवकरच पोलिसांना मिळेल. हा रिपोर्ट मिळाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >