Monday, October 27, 2025
Happy Diwali

शेअर बाजारात दिवाळीचा धूमधडाका ! बँक निफ्टीसह रिअल्टी शेअर्स तेजीत जागतिक अनुकुलतेचा 'असा' बाजारात फायदा ! सेन्सेक्स ५६६.९६ व निफ्टी १७०.९० अंकाने उसळला

शेअर बाजारात दिवाळीचा धूमधडाका ! बँक निफ्टीसह रिअल्टी शेअर्स तेजीत जागतिक अनुकुलतेचा 'असा' बाजारात फायदा ! सेन्सेक्स ५६६.९६ व निफ्टी १७०.९० अंकाने उसळला

मोहित सोमण:आज अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात मजबूतीसह वाढ प्रस्थापित झाली आहे. शेअर बाजारात आज मोठी वाढ गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या सकारात्मकतेमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः जागतिक अर्थव्यवस्थेतील संतुलित सकारात्मकता, जागतिक अर्थकारणातील अनुकूल परिस्थिती, अमेरिकन बाजारातील तेजी, आशियाई बाजारातील सकारात्मकता यांचा एकत्रित परिणाम म्हणून शेअर बाजार आज दिवसभरात 'बुलिश' राहिल्याने वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स ५६६.९६ अंकाने उसळत ८४७७८.८४ पातळीवर व निफ्टी १७०.९० अंकांनी उसळत २५९६६.०५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीतील वाढ आज निर्णायक ठरल्याने बाजारातील चैतन्य कायम टिकण्यासाठी मदत झाली. युएस बाजारात जानेवारीनंतर प्रथमच अपेक्षेपेक्षा सकारात्मक महागाई आकडेवारी (Inflation Data) आल्याने फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीचे संकेत गुंतवणूकदारांना मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा फायदा आज अखेरच्या सत्रातही वित्तीय, बँक निर्देशांकाला झाला आहे.

विशेषतः निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) सर्वाधिक वाढ आज पीएसयु बँक (२.२२%), रिअल्टी (१.४६%), तेल व गॅस (१.५२%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (१.१९%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (२.२२%) निर्देशांकात झाली आहे. मात्र मिडिया (०.२६%), फार्मा (०.२१%) निर्देशांकात भूराजकीय अस्थिरतेमुळे घसरण झाली. व्यापक निर्देशांकातील (Broad Indices) मिडकॅप ५० (१.०५%), मिडकॅप १०० (०.९३%), स्मॉलकॅप ५० (०.९३%), मिडस्मॉलकॅप ४०० (०.७४%) निर्देशांकात झाली.

बीएसईतील ४५०२ समभागापैकी २१७६ समभागात (Stocks) मध्ये वाढ झाली आहे तर २११३ समभागात घसरण झाली आहे. एनएसईत आज ३२४१ समभागापैकी १६३८ समभागात वाढ झाली आहे तर १५०७ समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले.सोमवारी दुपारपर्यंत सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झाली आहे.सोन्यातील दबाव पातळी कमी झाल्याने जागतिक गुंतवणूकदारांना कमोडिटीत दिलासा मिळाला परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण दिसून आली कारण गुंतवणूकदारांनी व्याजदर निर्णयांबाबत त्यांच्या अपेक्षा समायोजित केलेल्या जाणवल्या आहेत.मजबूत अमेरिकन डॉलरमुळे भावनांवर परिणाम झाला.

दुसरीकडे अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या साठ्यात ३ दशलक्ष बॅरलची घट झाल्यामुळे तेलाच्या किमती सुमारे $६१.८७ वर पोहोचल्या आहेत. एका महिन्यातील ही पहिलीच घसरण झाली. इंधनाच्या साठ्यातही घट झाली आहे ज्यामुळे जवळच्या काळात मागणी वाढण्याची शक्यता तज्ञांना दिसून येते.आज युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.५५%), एस अँड पी ५०० (०.७९%), नासडाक कंपोझिट (१.१५%) या तिन्ही बाजारात वाढीचे संकेत मिळत आहेत. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात जकार्ता कंपोझिट (१.९०%) वगळता इतर सर्व निर्देशांकात वाढ झाली आहे ज्यामध्ये सर्वाधिक वाढ निकेयी २२५ (२.२८%), हेंगसेंग (१.०१%), तैवान वेटेड (१.६५%), शांघाई कंपोझिट (१.१७%), कोसपी (२.५०%) निर्देशांकात झाली. जागतिक तुल्यबळ अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या शांघाई कंपोझिट (१.१७%) वाढ झाली आहे. प्रामुख्याने अमेरिकेसोबतच्या सततच्या व्यापार तणावा असूनही चीनच्या औद्योगिक नफ्यात सप्टेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २१.६% वाढ झाली आहे, असे राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने आज सांगितले. तज्ञांच्या मते, किंमत युद्धांना आळा घालण्याच्या बीजिंगच्या मोहिमेमुळे उत्पादकांवरील दबाव कमी होण्यास मदत झाली. ऑगस्टमध्ये औद्योगिक नफ्यात वर्षानुवर्षे २०.४% वाढ झाल्याने सुरू झालेल्या या तीव्र वाढीमुळे नोव्हेंबर २०२३ नंतरचा हा सर्वात मोठा फायदा झाला. सप्टेंबरमध्ये चीनच्या ग्राहकांच्या किमती अपेक्षेपेक्षा जास्त घसरल्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.३% घसरल्या, तर उत्पादक किंमत निर्देशांक २.३% घसरला आहे.आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत उत्पादन क्षेत्राच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.९% वाढ झाली आणि वीज, उष्णता, इंधन आणि पाणीपुरवठा कंपन्यांचे उत्पन्न १०.३% वाढले. खाण क्षेत्रात मात्र नफ्यात २९.३% घट झाली आहे.

आजच्या अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ फर्स्टसोर सोलूशन (८.०६%), ईक्लर्क सर्विसेस (७.६६%), आर आर केबल्स (६.५८%), एचबीएल इंजिनिअरिंग (६.५२%), नेटवेब टेक्नॉलॉजी (४.६८%), किर्लोस्कर ऑईल (४.६८%), भारती हेक्साकॉम (४.६२%), बँक ऑफ इंडिया (४.३४%), ए बी रिअल इस्टेट (४.३३%), कोफोर्ज (४.०३%), सिटी युनियन बँक (३.७९%), पीबी फिनटेक (३.७८%) निर्देशांकात वाढ झाली आहे.

आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण झेन टेक्नॉलॉजी (४.०६%), एसबीआय कार्ड (३.०३%), कोहान्स लाईफ (२.९६%), अदानी पॉवर (२.८४%), चोला फायनांशियल सर्विसेस (२.७३%), ब्रेनबीज सोलूशन (२.४९%), आधार हाउसिंग फायनान्स (२.१८%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (२.३३%), एस आर एफ (२.०३%), होनसा कंज्यूमर (२.०१%), सीएट (२.१३%), महानगर गॅस (१.७८%), कोटक महिंद्रा बँक (१.७८%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय शेअर बाजारांनी आठवड्याची सुरुवात मजबूत पायावर केली, ज्याला अमेरिका-चीन व्यापार तणाव कमी झाल्यामुळे आणि संभाव्य व्यापार कराराबद्दल नवीन आशावाद मिळाला. निफ्टी निर्देशांक २६००० पातळीच्या वर चढला परंतु त्या पातळीवर प्रतिकाराचा सामना करावा लागला, ज्यामुळे अखेर त्याचे नफा मजबूत झाला. क्षेत्रनिहाय, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, रिअल्टी, तेल आणि वायू, पायाभूत सुविधा आणि धातू समभागांमध्ये खरेदीची आवड प्रमुख होती, तर फार्मा, आरोग्यसेवा आणि मीडिया काउंटरमध्ये कमकुवतपणा कायम होता. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, बाजारातील भावना तेजीत होती, १५८ समभागांनी वाढ केली तर ५६ समभाग घसरले. उल्लेखनीय म्हणजे, इंडस टॉवर्स, एसआरएफ, एसबीआय लाईफ, अल्केम आणि सोना कॉमस्टारमध्ये सर्वाधिक ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आले, जे या काउंटरमध्ये सक्रिय सहभाग दर्शवते. एकूणच, बाजाराचा सूर रचनात्मक राहिला, जरी सहभागी २६००० पातळीला जवळच्या काळातील प्रमुख प्रतिकार म्हणून पाहू शकतात.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >