मराठा-कुणबी आरक्षण जीआरवर तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यास नकार दिला. मात्र, ओबीसी वेलफेअर असोसिएशनला अंशतः दिलासा देत स्वतंत्र अर्ज दाखल करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिली.


ओबीसी वेलफेअर असोसिएशनचे मंगेश ससाणे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत संघटनेने असा दावा केला होता की, राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेल्या कुणबी प्रमाणपत्र जीआरनंतर मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी बॉम्बे उच्च न्यायालयातील सुनावणी तातडीने घेण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाला विशिष्ट वेळेत सुनावणी घेण्याचे निर्देश आम्ही देऊ शकत नाही.


मात्र, याचिकाकर्त्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल करून तातडीच्या सुनावणीची विनंती उच्च न्यायालयाकडे करावी. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी वेलफेअर संघटनेची लवकर सुनावणीची मागणी फेटाळली आहे. पण स्वतंत्र अर्ज दाखल करण्याची मुभा देऊन त्यांना अंशतः दिलासा दिला आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी संघटनेच्या मागणीला विरोध केला आहे.


'आम्ही उच्च न्यायालयात लवकर सुनावणीसाठी अर्ज करू शकतो. आम्ही आता तातडीने तो अर्ज दाखल करणार आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमची बाजू उच्च न्यायालयात ऐकून घेतली जाणार आहे हा आमच्यासाठी दिलासा आहे,' असे ओबीसी वेलफेअर असोसिएशनचे वकील मंगेश ससाणे म्हणाले.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात

अयोध्येत राम मंदिराचे काम पूर्णत्वास! मुख्य मंदिरासह सहा उपमंदिरांचेही काम पूर्ण

अयोध्या : शतकानुशतके चाललेल्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता आली

स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज ‘इक्षक’ ६ नोव्हेंबरला नौदलात होणार सामील

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज 'इक्षक' ६ नोव्हेंबर रोजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी

Election Commission : वादग्रस्त 'एसआयआर' मोहीम आता 'या' १२ राज्यांत!

बिहारमधील टीकेनंतरही केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; १२ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांत एसआयआरचा दुसरा

विमानतळावरचे महागडे पदार्थ खरेदी करायचे नसतील तर ट्राय करा ही आयडिया

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागडे पदार्थ खरेदी करण्याआधी

धक्कादायक! वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, वंशद्वेषातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय

लंडन: ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय वंशाच्या २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक