नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. याआधीच नियम आणि परंपरेला अनुसरुन सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून एका वरिष्ठ न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस केली आहे. ही शिफारस सरन्यायाधीशांनी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाला पाठवली आहे. आता देशाच्या ५३ व्या सरन्यायाधीशांच्या निवडीची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे.
नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच निवृत्त होत आहेत. भूषण गवई २३ ...
याआधी भारताचे ५१ वे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाले आणि ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सूत्रं हाती घेतली होती. गवई यांनी १४ मे २०२५ रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती. ते २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर सूर्यकांत हे देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रं हाती घेण्याची शक्यता आहे. सूर्यकांत हे ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होणार आहेत.
भारतात सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांसाठी निवृत्तीचे वय ६५ वर्ष हे आहे. सरन्यायाधीश तसेच सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती यांना हा नियम लागू आहे. नियम आणि परंपरेला अनुसरुन कार्यरत सरन्यायाधीश हे निवृत्त होण्याआधी पुढील सरन्यायाधीश म्हणून एका नावाची शिफारस करतात. ही शिफारस सरन्यायाधीशांनी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाला पाठवायची असते. यानंतर सरन्यायाधीशांच्या निवडीची कायदेशीर प्रक्रिया सुरू होते.






