मुंबई : अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी नाईकचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे . या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवानीचा होणार नवरा आहे तरी कोण याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.
26 ऑक्टोबर रोजी शिवानीचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला . शिवानीने ज्याच्याशी साखरपुडा केला, तो सुद्धा उत्तम मराठी कलाकार आहे. त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये काम आहे.
शिवानीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अमित रेखी असं आहे. गेल्या काही काळापासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. अखेर रविवारी त्यांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला अभिनेत्री निवेदिता सराफ यांची खास उपस्थिती होती.
अमित रेखीने 'भाग्य दिले तू मला', 'पिंगा गं पोरी पिंगा', 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. शिवानी आणि अमित यांनी काही नाटकांमध्ये एकत्र काम केलंय. तिथूनच त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली.
अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी जेव्हा शिवानी नाईकची निवड झाली होती, तेव्हा अमितने तिच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. आता या दोघांचे साखरपुड्याचे फोटो बघून सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






