हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. या तपासणी दरम्यान दोन मद्यधुंद दुचाकीस्वारांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यात बसला लागलेल्या भीषण आगीमुळे २० जणांचा मृत्यू झाला होता.
या अपघातात एक दुचाकी बसखाली आल्याने तिची इंधन टाकी फुटली आणि बसने पेट घेतला अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, कुर्नूल रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) कोया प्रवीण पीटीआयसोबत बोलतना म्हणाले, "आम्हाला नुकताच फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाला. ज्यात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती (शिव शंकर आणि एरी स्वामी) नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे." महत्वाचे म्हणजे, पोलिसांना हे माहीत होते. पण, पोलीस या वस्तुस्थितीचा फॉरेन्सिक रिपोर्ट येण्याची वाट पाहत होते, असेही ते म्हणाले.
नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण (SIR) ...
शंकरचा मृत्यू झाल्याचे पाहिल्यानंतर स्वामी दुचाकी रस्त्यावरून बाजूला करण्याच्या विचारात असतानाच, मागून येणारी भरधाव बस दुचाकीवरून गेली. तिच्यासोबत ती दुचाकीही काही अंतरापर्यंत घसरत गेली. यामुळेच बसने पेट घेतला. बसला आग लागल्यानंतर भयभीत झालेला स्वामी तेथून पळून गेला. या नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.





