Sunday, October 26, 2025
Happy Diwali

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना छठपुजेनिमित्त शुभेच्छा दिल्या. सोबतच वंदे मातरम, राष्ट्रगीत हि भाताची जिवंत आणि उत्साही प्रतिमा असल्याचे ही म्हटले, आजच्या 'मन की बात' याचे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी तेलुगूसह भारतातील ११ भाषांमध्ये प्रसारित करण्यात आले. आजच्या मन की बात यामध्ये मोदी यांनी सांस्कृतिक आणि आर्थिक उपक्रमांच्या प्रचाराचे कौतुक केले. तसेच आजच्या कार्यक्रमाद्वारे भारत सरकारने 'एआयच्या' मदतीने ११ भाषांमध्ये 'मन की बात' प्रसारित करून आधुनिक भारताची झलक दाखवली. महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये भारतास सरकारने एआय सह अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक धावली आहे. भारत हा एआय मध्ये चीन आणि पाश्चिमात्य देशांना टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहे. याची एक झलक आज पाहायला मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण किती भाषांमध्ये प्रसारित करण्यात आले

'मन की बात' याचा १२७ भाग प्रसारित झाला असून हे भाषण ११ भाषांमध्ये प्रसारित झाले, यात मल्याळम, तेलगू, इंग्रजी, गुजराती, मराठी, आसामी, उडिया, बंगाली, तामिळ, कन्नड या भाषांचा समावेश होता. एआय च्या मदतीमुळेच खेड्यापाड्यातील लाखो लोकांना आपल्या भाषेत आपल्या पंतप्रधानाचे भाषण ऐकता आले. मन की बात यामध्ये मोदी काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वंदे मातरमच्या' १५० वर्षांच्या पूर्ततेनिमित्त देशवासीयांचे अभिनंदन केले आणि याचे मूल्य पुढील पिढींपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही केले. तसेच आपल्या भाषणात बीएसएफ आणि सीआरपीएफ मधील स्थानिक श्वानांच्या उत्कृष्ट भूमिकेचे आणि शौर्याचे कौतुकही केले.

संस्कृत भाषेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, संस्कृती आणि सोशल मीडियाच्या जगाने संस्कृतला जीवनाची एक नवीन संधी दिली आहे. सध्या अनेक तरुण रीलद्वारे या भाषेत बोलत आहेत आणि त्याबद्दल जागरूकता पसरवत आहेत. ही या भाषेसाठी महत्त्वाची बाब आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा