Sunday, October 26, 2025
Happy Diwali

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये रोहितनं दमदार शतक झळकावलं, तर विराट कोहलीनं अर्धशतक झळकावून चाहत्यांना खुश केलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या दोघांचीच जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीचा एक भावनिक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

चाहत्यांचं हॅन्डशेक स्विकारत असताना एका चाहत्याच्या हातातून भारतीय ध्वज खाली पडला. पण गर्दीतही विराटचं लक्ष लगेच त्या झेंड्याकडे गेलं. त्यानं तत्काळ मागे फिरून खाली वाकत झेंडा उचलला आणि चाहत्याला परत दिला. विराटच्या या देशभक्तीच्या कृतीचं फॅन्सकडून भरभरून कौतुक होत आहे.

हा व्हिडिओ @vannumeena0 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, मैदानातून ड्रेसिंग रूमकडे जात असताना विराट आणि रोहित दोघंही चाहत्यांचं हॅन्डशेक स्विकारत होते. तेव्हाच शिड्या चढताना एका चाहत्याच्या हातून भारतीय ध्वज खाली पडला, आणि विराटनं लगेचच तो उचलून परत दिला. हा प्रसंग पाहून चाहत्यांनी विराटच्या देशप्रेमाचं आणि नम्रतेचं भरभरून कौतुक केलं आहे.

पहिले दोन सामने हरल्यामुळे भारतानं मालिका २-० ने गमावली होती. मात्र, जर तिसरी मॅचही हरली असती, तर व्हाईटवॉश झाला असता. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघानं अक्षरशः जीव ओतून खेळ खेळला. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट मारा करत ऑस्ट्रेलियाला फक्त २३६ धावांवर रोखलं, आणि नंतर रोहित-विराटनं अप्रतिम बॅटिंग करत ३८ व्या षटकातच भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात रोहितनं १२१ धावा, तर विराटनं ७४ धावा करत १५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. या जबरदस्त विजयामुळे भारतीय फॅन्स खूष आहेत आणि “रोहित-विराट जोडी”चं सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे.

Comments
Add Comment