मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व मार्गे अंधेरी पश्चिमपर्यंत जाते. मात्र आता गुंदवलीवरून थेट मिरा रोडपर्यंत प्रवास करता येणार आहे.


आता मेट्रो २अ (पिवळी मार्गिका / Yellow Line) आणि मेट्रो ७ (लाल मार्गिका / Red Line) स्वतंत्रपणे चालवल्या जाणार आहेत. सध्या दोन्ही मार्गिकांचे संचालन चारकोप डेपोतून होत असले तरी पुढे मेट्रो ७ चे संचालन चारकोप डेपोतून आणि मेट्रो २अ चे संचालन मंडाळे डेपोतून होईल. मेट्रो २ब (डायमंड गार्डन - मंडाळे) हा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे मेट्रो २अ आणि २ब या दोन्ही मार्गिका जोडल्या जातील.


दहिसर पूर्व ते काशिगाव (मिरा रोड) या मेट्रो ९ मार्गिकेचे कामही अंतिम टप्प्यात असून, ती लवकरच सुरू होणार आहे. नंतर मेट्रो ७ आणि मेट्रो ९ जोडल्या जातील त्यामुळे गुंदवलीवरून मिरा रोडपर्यंत थेट मेट्रो सेवा उपलब्ध होईल. तसेच मेट्रो ७ चा विस्तार विमानतळापर्यंत होणार आहे. यानंतर मेट्रो ७अ, ७ आणि ९ या तिन्ही मार्गिका एकत्रित होतील. या बदलांमुळे मुंबईतील चेंबूर, कुर्ला, BKC, विमानतळ आणि काशिगाव ही ठिकाणे थेट मेट्रोद्वारे जोडली जातील.


मुंबई मेट्रोचे जाळे आणखी विस्तारत असून, पुढील काही महिन्यांत अंधेरी ते मिरा रोड, तसेच चेंबूर ते विमानतळ या महत्त्वाच्या भागांमध्ये प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे.

Comments
Add Comment

प्रारुप मतदार यादीबाबत १०,६६८ तक्रारींचे निवारण

कंट्रोल चार्टद्वारे मतदार यादीची केली जाते पडताळणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता