कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ उडाली. शंकर गल्लीतील १७ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २०५ च्या हॉलमध्ये आग लागली होती. सकाळी सुमारे ७:४५ वाजता आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि फक्त २० मिनिटांत, म्हणजेच सकाळी ८:०५ वाजता आग आटोक्यात आणली.


अग्निशमन दलाच्या जवानांनी जिन्याचा वापर करून इमारतीतील आठ रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि तीन मुलांचा समावेश होता. सुटका करण्यात आलेल्यांपैकी चिंतन अभय कोठारी (४५), ख्याती चिंतन कोठारी (४२) आणि ज्योती अभय कोठारी (६६) या तिघांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने मालाड येथील तुंगा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे रुग्णालय प्रशासनाने कळवले. उर्वरित पाच जणांना किरकोळ दुखापती झाल्या असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या आगीत हॉलमधील इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर आणि लाकडी वस्तूंचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.



जोगेश्वरीतील बहुमजली व्यावसायिक इमारतीला आग


मुंबईत याच आठवड्यात दुसरी मोठी आग जोगेश्वरी उपनगरातील जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये लागली. गुरुवारी सकाळी १०.५० च्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे तब्बल १७ जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या सर्वांना वैद्यकीय मदत द्यावी लागली. जोगश्वरीच्या १३ मजली व्यावसायिक इमारतीच्या ९व्या ते १३व्या मजल्यांपर्यंत ज्वाळा पसरल्या होत्या. चौथ्या मजल्यापासून १३व्या मजल्यापर्यंत विद्युत डक्टमधून धूर आणि ज्वाळा पसरल्याने परिस्थिती गंभीर बनली.


या ठिकाणी १२ अग्निशमन गाड्या आणि विविध यंत्रणा तैनात करून आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले. अग्निशमन दलाने हायड्रॉलिक शिडीच्या मदतीने दोन महिलांसह २७ जणांना सुरक्षित बाहेर काढले. तरीही दाट धुरामुळे श्वास घेता न आल्याने १७ जणांचा त्रास झाला. उर्वरित नऊ जणांवर एचबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मुंबईत काही दिवसांपासून सलग लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांमधून सुरक्षाव्यवस्थेच्या तपासणीची आणि विद्युत यंत्रणांच्या देखभालीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

भायखळ्यात उबाठा आणि शिवसेनेतच होणार लढाई, कोणत्या जागांवर असेल, कुणाचा पत्ता कापला जाणार? जाणून घ्या

मुंबई (सचिन धानजी) : दक्षिण मुंबईतील भायखळा विधानसभेत उबाठाचे मनोज जामसूतकर हे आमदार म्हणून निवडून आले. लोकसभा

पवई तलावातील जल प्रदूषण रोखणार, ईस्ट इंडिया कंपनीची महापालिकेने केली निवड

मुंबई (सचिन धानजी): पवई तलावात होणारे मलमिश्रित सांडपाण्याचे प्रदुषण कमी करण्यासाठी आता पवई येथील सध्या बंद

महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षणावर आल्या फक्त १२९ हरकती सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकी करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती.

महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत पुढे ढकलली, पुढील आठवड्यात जाहीर केली जाणार तारीख

मुंबई (खास प्रतिनिधी): जाहीर करण्यात आलेल्या ४२६ घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी २० नोव्हेंबरला सोडत काढण्यात

व्याजाचा आणि घराच्या रकमेचा परतावा न केल्यास विकासकाला तुरुंगवास

मुंबई : महारेराने एक महत्त्वपूर्ण आणि घरखरेदीदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी

मुंबई : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबई व मुंबई उपनगर