Saturday, October 25, 2025
Happy Diwali

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची हत्या त्यांच्या स्वपत्नीने म्हणजे चैताली भोईर (वय २८) यांनी केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजकीय महत्वकांक्षा आणि चारित्र्याच्या संशयामुळे नकुल भोईर यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. चैताली भोईर या नगरसेवक बनण्याचे स्वप्न पाहत होते. तर नकुल भोईर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शहीद भगतसिंग परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नकुल आपल्या पत्नी चैतालीवर वारंवार संशय घेत असे, ज्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत होती. चैताली महत्त्वाकांक्षी होत्या आणि त्यांना राजकारणात प्रवेश करायचा होता. काल मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा एकदा चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन, रागाच्या भरात चैतालीने पती नकुलच्या गळ्याभोवती ओढणीचा फास आवळून त्यांची हत्या केली. ही घटना घडली तेव्हा त्यांची दोन आणि पाच वर्षांची मुले आतल्या खोलीत झोपलेली होती. दरम्यान पोलिसांनी चैताली भोईरला अटक केली असून, कौटुंबिक रागातूनच हे कृत्य घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Comments
Add Comment