Saturday, October 25, 2025
Happy Diwali

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी वाढते आहे. पावसाळा असो वा उन्हाळा कोणताही ऋतू असो भक्तांची अखंड गर्दी राममंदिरात पहायला मिळते आहे. सध्या हिवाळ्याची चाहूल लागलेली आहे. शरद ऋतू सुरु झाला आहे त्याचबरोबर भक्तांची प्रचंड गर्दी बघायला मिळते आहे. त्यामुळे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंदिर उघडण्याची आणि बंद करण्याच्या वेळेत बदल केलेला आहे.

अयोध्येच्या राम मंदिरातील दर्शन वेळेत बदल

उत्तर भारतात हळू हळू थंडीचा जोर वाढेल. या बदलत्या तापमानाचा अंदाज घेऊन अयोध्येच्या राम मंदिरातील दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. आता मंदिराचे दरवाजे सकाळी ६:३० ऐवजी ७ वाजता भक्तांसाठी उघडतील, तर प्रभू रामाच्या दर्शनाची वेळ रात्री ९:४५ ऐवजी ९:१५ वाजेपर्यंत असेल.

श्रीराम मंदिरातील आरती वेळेतील बदल

मंगलआरती आता पहाटे ४:३० वाजता. शृंगार आरती सकाळी ६:३० वाजता. शयन आरती रात्री ९:३० वाजता.

दररोज दुपारी १२ ते १ या वेळेत मंदिराचे दरवाजे बंद राहतील, कारण त्या वेळी देवाला भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो. मंदिरातील तीनही आरतींसाठी ऑनलाईन पास बुकिंग ७ नोव्हेंबरपर्यंत पूर्णतः भरलेले आहे. मंदिरातील सेवक आपल्या पोर्टलद्वारे दररोज तीनही आरतींसाठी ६० पास जाहीर करत असतात. तसेच, भक्तांसाठी केलेल्या विशेष ‘सुगम दर्शन’ सुविधेसाठी असलेले बुकिंग ७ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण भरलेले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वेब पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर दररोज ३२५ भक्तांना ‘सुगम दर्शन’ कार्ड मिळवण्याची संधी मिळते.

दर्शनातील बदलाचे कारण

अयोध्येमधील राम मंदिरातील बदल हा हिवाळ्यातील गारठा आणि भक्तांच्या सोयीचा विचार करून करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रभू रामाच्या दर्शनाचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे आणि शांत वातावरणात घेता येईल.

Comments
Add Comment