अजून काय हवं! चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत, ‘अभंग तुकाराम’ चित्रपटासाठी चाहत्यांची अनोखी भेट

कलांचा आस्वाद घेत रसिकही दाद देऊन एकप्रकारे त्या कलाकृतीला पूर्णत्वच देत असतो. सगळेच कलाकार होऊ शकत नाहीत पण आस्वादक, रसिक मात्र नक्कीच होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक कलाकारासाठी रसिकांचे प्रेम ही तेवढेच महत्त्वाचे असते.


आपला संत साहित्याचा अमूल्य ठेवा आपल्या संस्कृती, परंपरा आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. या परंपरेचा एक मानबिंदू असलेला 'अभंग तुकाराम' हा मराठी चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि त्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. हा टिझर चाहत्यांना एवढा आवडला की, प्रेमापोटी चाहत्यांनी या चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत करून पाठविला आहे.


हा केवळ कलाकारांचा गौरव नाही तर एका कलाकृतीला मिळालेली रसिकतेची उत्कृष्ट दाद आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था 'अभंग तुकाराम' या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे.


या टिझरचा संस्कृत अनुवाद डॉ. श्रीहरी व्ही गोकर्णकर यांनी केला आहे तर डबिंगची जबाबदारी श्रीमती मनीषा पंडित, डॉ.श्रीहरी गोकर्णकर यांनी सांभाळली आहे. व्हिडिओ संकलन आणि व्हॉइस रेकॉर्डिंग वेदांत नितीन जोग यांनी केले आहे. ऑपरेशनल सपोर्ट श्री. प्रांजल अक्कलकोटकर यांचा आहे.


आपल्यावर, आपल्या कामावर कोणी इतके प्रेम करते, ही भावनाच खूप आनंद देणारी आहे आणि या प्रेमामुळे आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची ऊर्जा मिळते. 'अभंग तुकाराम' हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. चित्रपट तर माझ्यासोबत आयुष्यभर असणारच आहे. मात्र रसिकांची ही उत्स्फूर्त दाद ही माझ्यासोबत कायम असेल, अशी भावना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी बोलून दाखविली.

Comments
Add Comment

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी

धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी

'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना