Saturday, October 25, 2025
Happy Diwali

तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद, भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर समितीने घेतला निर्णय

तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद, भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर समितीने घेतला निर्णय

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची आई तुळजाभवानी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. याच कारणामुळे या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. लागोपाठ असणाऱ्या सुट्ट्यांमुळे आणि दिवाळीच्या सणामुळे सध्या मंदिरात प्रचंड गर्दी आहे. वाढलेली ही अलोट गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्य प्रवेशद्वार दोन दिवसासाठी बंद

मंदिर संस्थानाच्या निर्णयानुसार आज (शनिवार ) आणि उद्या (रविवार ) असे दोन दिवस मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद असणार आहे. या दोन दिवसात मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी घाटशीळ बाजूकडून मंदिरात येण्याचा मार्ग खुला करून देण्यात येणार आहे.

२०० रुपयांचे पास बंद

मंदिर संस्थानांकडून आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे गर्दीच्या व्यवस्थापनासाठी २०० रुपयांचे पास देखील पुढील २ दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना एकाच रांगेतून दर्शनासाठी जावे लागणार आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता राखून देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर संस्थानाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >