Saturday, November 15, 2025

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ० अशी जिंकली आहे. सिडनीतला सामना जिंकून भारत व्हाईटवॉश टाळतो की ऑस्ट्रेलिया मालिका ३ - ० अशी जिंकते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सुरुवात बरी केली पण नंतर भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचे तळाचे फलंदाज ढेपाळले. भारताने ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट केले. कांगारुंनी ४६.४ षटकांत सर्वबाद २३६ धावा केल्या आणि भारतापुढे ५० षटकांत २३७ धावा करण्याचे आव्हान ठेवले.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ४१, हेडने २९, मॅथ्यू शॉर्टने ३०, रेनशॉने ५६, अ‍ॅलेक्स कॅरीने २४, कूपर कॉनोलीने २३, मिचेल ओवेनने १, मिचेल स्टार्कने २, नॅथन अॅलिसने १६, झम्पाने नाबाद २ आणि हेझवूडने शून्य धावांचे योगदान दिले. भारताकडून हर्षित राणाने चार, वॉशिंग्टन सुंदरने दोन तर अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने १६ षटकांत एक बाद १०२ धावा केल्या आहेत. शुभमन गिल २४ धावा करुन हेझलवूडच्या चेंडूवर अलेक्स केरीकडे झेल देऊन परतला. रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळत आहेत.

Comments
Add Comment