मोहित सोमण:रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत कपात करण्याचे ठरवले अशी माहिती अलीकडे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिली होता. प्रतिदिनी ५ लाख बॅरेल तेल खरेदीचा करार यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने दीर्घकालीन करा र केला होता त्यावर नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीजकडून नवे वक्तव्य समोर आले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने यावर निश्चित होकार अथवा नकार दिला नसून 'आम्ही भारत सरकारच्या नियमावलीचे पालन करू' अशी मोघम प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. त्यामुळे यावरील निश्चित निर्णयाची पुष्टी अद्याप रिलायन्सकडून करण्यात आली नाही. भारत हा रशियाचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कच्च्या तेलाची खरेदी न रोखल्यास आणखी १०० ते १५०% शुल्कवाढ करण्याची धमकी दिली होती. भारताने यावर सावध प्रतिक्रिया देत करार 'बंदुकीने' होत नसल्याचा निर्वाळा दिला होता.
याच पार्श्वभूमीवर रिलायन्स इंरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या प्रवक्त्याचे निवेदन आले आहे. त्यांनी म्हटले,' युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यांनी रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर आणि युरोपमध्ये रिफाइंड उत्पादनां च्या निर्यातीवर अलीकडेच घातलेल्या निर्बंधांची आम्ही नोंद घेतली आहे. रिलायन्स सध्या या निर्णयांचा परिणाम आणि नव्या अनुपालनाच्या (compliance) गरजांचे मूल्यांकन करत आहे. आम्ही युरोपमध्ये रिफाइंड उत्पादनांच्या आयातीसंदर्भात ईयूच्या मार्गदर्श क तत्त्वांचे पालन करू. तसेच या संदर्भात भारत सरकारकडून जेव्हा मार्गदर्शन मिळेल, तेव्हा नेहमीप्रमाणे त्याचे पूर्ण पालन करू. रिलायन्सने नेहमीच भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.कंपनी निर्बंध आणि नियामक चौकटींचे (Regulatory Framework) पालन करण्याच्या आपल्या निर्दोष इतिहासाला कायम ठेवण्यास कटिबद्ध आहे आणि अनुपालनाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी रिफायनरी ऑपरेशन्समध्ये आवश्यक बदल करेल. पुरवठा करार (supply contracts) बदलत्या बाजारपेठेच्या आणि नियामक परिस्थितीच्या आधारे वेळोवेळी बदलत असतात, ही उद्योगासाठी सर्वसाधारण बाब आहे. रिलायन्स आपल्या पुरवठादारांसोबतचे संबंध टिकवून ठेवत या परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाईल. रिलायन्सला विश्वास आहे की, विविध स्रोतांमधून कच्च्या तेलाच्या पुरवठ्याची आपली रणनीती देशांतर्गत आणि निर्यात गरजा पूर्ण करताना रिफायनरी ऑपरेशन्सची स्थिरता आणि विश्वसनीयता सुनिश्चित करेल.' मुकेश अंबानी यांच्या मालकीची आरआयएल पश्चिम गुजरात राज्यातील जामनगर येथे जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवते. कंपनीने रशियन तेल प्रमुख रोसनेफ्टकडून सुमारे ५००००० बॅरल कच्चे तेल खरेदी करण्याचा दीर्घकालीन करार केला आहे.
बुधवारी युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनविरोधात असलेल्या रशियावर कडे निर्बंध घातले आहेत. युरोपियन युनियननेही यापूर्वी रशियाच्या तेलावर निर्बंध घालून रूसची नाकेबंदी वेळोवेळी केली. याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी त्यांची निराशा वाढत असताना, लुकोइल आणि रोसनेफ्ट या दोन तेल कंपन्यांना लक्ष्य केले.रशियन कच्च्या तेलाचा भारतातील सर्वात मोठा खरेदीदार असलेला रिलायन्स जगातील सर्वात मोठ्या रिफायनिंग कॉम्प्लेक्ससाठी स्पॉट मार्केटमधून रशियन तेल खरेदी करतो ज्याची क्षमता १.४ दशलक्ष बॅरल तेल प्रक्रिया करण्याची आहे.दोन शीर्ष रशियन उत्पादकांवर अमेरिकेने लादलेल्या नवीन निर्बंधांचे पालन करण्यासाठी भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्या रशियन तेलाची आयात मोठ्या प्रमाणात कमी करण्यास तयार आहेत. या हालचालीचा उद्देश अमेरिकेसोबतच्या व्यापार करारातील एक मोठा अडथळा दूर करणे आहे. या व्यतिरिक्त, नायरा एनर्जी, ज्याचा सर्वात मोठा शेअरहोल्डर रोसनेफ्ट आहे, ती देखील रशियन राज्य कंपनीकडून तेल खरेदी करते असे जाणकारांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर ५०% कर लावण्याची भारताला शक्यता असताना ही घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी निम्मे कर हे रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या बदल्यात लादले जात आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी वारंवार म्हटले आहे की, भारत एक संभाव्य व्यापार करारावर वाटाघाटी करत आहे ज्यामुळे मॉस्कोमधून कच्च्या तेलाची आयात बंद करण्याच्या बदल्यात आशियाई देशांसोबत हे कर जुळवून घेता येतील. दरम्यान, ट्रम्प यांनी अनेक वेळा दावा केला आहे की, टॅरिफ लागू झाल्यानंतर भारताने रशियन तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शविली आहे. तथापि, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे दावे फेटाळून लावले आहेत की भारताचे ऊर्जा आयात धोरण बाह्य दबावाने नव्हे तर राष्ट्रीय हित आणि ग्राहकांच्या धोरणांनी चालेल. त्यामुळे या सगळ्या घडामोडींमुळे युएस भारत व्यापार भागीदारीतील संभाव्य यश अद्याप स्पष्ट झालेले नाही.






