प्रतिनिधी:भारताच्या विदेशी चलनसाठ्यात (Foreign Exchange Reserves) संकलनात ४.४९६ अब्ज डॉलरवरून ७०२.२८ अब्ज डॉलर वाढ झालेली असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत सोन्याच्या संकलनात वाढ झाल्याने परदेशी चलनसाठ्यात ही वाढ झाल्याचे आरबीआयने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे. गेल्या आठवड्यात एकूण साठा २.१८ अब्ज डॉलरवरुन प्रचंड वाढत ६९७.७८ अब्ज डॉलरवर गेला होता. प्रामुख्याने जागतिक अस्थिरतेत आरबीआयने चलन नियंत्रित करण्यासाठी हे धो रणात्मक पाऊल उचलले होते.
आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य ६.१८ अब्ज डॉलरने वाढून १०८.५५ अब्ज डॉलर झाले असे आरबीआयने म्हटले आहे. विशेष रेखांकन हक्क (Special Drawing Rights SDR)३७ दशलक्ष डॉलरने वाढून १८.७२ अब्ज डॉलर झाले आहेत, असे आरबीआ यने आपल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे.
बँकेच्या आकडेवारीनुसार, अहवाल आठवड्यात आयएमएफकडे भारताची राखीव ठेव ३० डॉलर दशलक्षने घसरून ४.६० अब्ज डॉलर झाली आहे. डॉलरच्या संदर्भात व्यक्त केल्यास एकूणच परकीय चलन मालमत्तेत परकीय चलनसाठ्यात असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या गैर-अमेरिकन युनिट्सच्या वाढ किंवा अवमूल्यनाचे (Devaluation) परिणाम समाविष्ट आहेत.






