Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात नाव असलेल्या दोन आरोपींपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आत्महत्येची नोंद असलेल्या सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप असलेला आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे. बनकरच्या शोधासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली होती.

अखेर, तब्बल २४ तासांनंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी पीएसआय (PSI) गोपाळ बदने (Gopal Badane) हा मात्र २४ तासांनंतरही फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. मृत डॉक्टरने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप केले होत. पीएसआय गोपाळ बदने याने आपल्यावर ४ वेळा अत्याचार (Atrocities) केल्याचे तिने नमूद केले होते. तर प्रशांत बनकर याने आपला मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करत या तरुणीने आपले आयुष्य संपवले होते. या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण साताऱ्यात मोठी खळबळ माजली आहे.

कुठे लपला होता आरोपी ?

'शारीरिक छळ' करणारा आरोपी प्रशांत बनकर पुण्यातून अटक;

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामुळे (Suicide Case) मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) डॉक्टरने दोन व्यक्तींना मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. यातील पहिला आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी तब्बल २४ तासांनंतर अटक केली आहे. प्रशांत बनकर हा गेल्या चार महिन्यांपासून डॉक्टरचा शारीरिक आणि मानसिक छळ (Mental and Physical Harassment) करत असल्याचा उल्लेख नोटमध्ये होता. बनकरच्या शोधासाठी चार पथके रवाना झाली होती आणि त्याला अखेर पुण्यातून (Pune) अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरा मुख्य आरोपी, पोलीस निरीक्षक (PSI) गोपाळ बदने, ज्याने आपल्यावर चार वेळा अत्याचार (Atrocities) केल्याचे नोटमध्ये नमूद आहे, तो मात्र अद्यापही फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. 'सर्व शासकीय कामात सत्ताधारी आमदार सचिन कांबळे (Sachin Kamble) आणि अभिजित निंबाळकर (Abhijit Nimbalkar) यांनी हस्तक्षेप केला', असा दावा दानवे यांनी केला असून, या प्रकरणातील दोषींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >