फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित


नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक मोठा बदल केला आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० च्या अनुषंगाने, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी किमान वय ६+ वर्षे निश्चित केले आहे. हा नवीन नियम २०२६-२७ सत्रापासून राजधानीतील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये लागू केला जाईल. शिक्षण संचालनालयाने (डीओई) जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पायाभूत टप्प्यासाठीची रचना आणि प्रवेश वयोमर्यादा टप्प्याटप्प्याने सुधारित केली जाईल.


नवीन वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल (३१ मार्चच्या वयानुसार):


ज्युनिअर केजी (बालवाडी-२/प्री-स्कूल-२): ४ ते ५ वर्षे
सिनिअर केजी (बालवाडी-३/प्री-स्कूल-३): ५ ते ६ वर्षे
इयत्ता पहिली : ६ ते ७ वर्षे
तथापि, शाळा प्रमुखांना किमान आणि कमाल वयोमर्यादा एक महिन्यापर्यंत शिथिल करण्याचा अधिकार असेल. चालू सत्रातील विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार नाही. परिपत्रकात असे स्पष्ट केले आहे की, नवीन वयोमर्यादा २०२५-२६ सत्रातील विद्यार्थ्यांवर होणार नाही. विद्यमान नर्सरी, केजी आणि पहिली इयत्तेतील विद्यार्थी पुढील सत्रात विद्यमान रचनेनुसार सुरू राहतील.


नवीन रचना २०२७-२८ पासून लागू
२०२७-२८ पासून नवीन शैक्षणिक रचना पूर्णपणे लागू केली जाईल, जेव्हा ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी वर्ग सुरू होतील. या वर्गांमध्ये प्रवेश नवीन वयोमर्यादेनुसार असेल. मागील शाळेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूट
मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या आणि त्यांचे शाळा सोडल्याचा दाखला (एसएलसी) आणि गुणपत्रिका असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादेतून सूट दिली जाईल.
शिक्षण संचालनालयाने सर्व शाळा प्रमुखांना या बदलांबद्दल पालकांना स्पष्टपणे माहिती देण्याचे आणि नवीन वयोमर्यादेचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

भारतातील पहिल्या खासगी व्यावसायिक रॉकेट विक्रम १ चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील स्पेसटेक स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसच्या इन्फिनिटी

'तेल खरेदीसाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही'

रशियाकडून खरेदीबाबत भारत ठाम नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जिथे मिळेल तिथून कमीत कमी किमतीत तेल खरेदी करेल.

पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला फटका

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढले मुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज,

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.