बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. हा नवीन नियम १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे. नामांकन प्रक्रिया संपूर्ण बँकिंग प्रणालीमध्ये सुलभ आणि एकसमान करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. जेणेकरून दाव्यांचा निपटारा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. बँकिंग कायदे (दुरुस्ती), 2025 अंतर्गत नामांकनाशी संबंधित हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे.
नॉमिनीच्या मृत्यूनंतरही अनेक खातेदार नॉमिनीचे नाव बदलत नाहीत. जर खातेदाराचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर खात्यातील रक्कम कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहोचवण्यात खूप अडचणी येतात. अशा परिस्थितीत अनेक प्रकारची कागदपत्रे पूर्ण करावी लागतात. यासाठी बराच वेळ लागतो. मात्र आता चार नॉमिनेट व्यक्तींचा हा नियम अशा वादांपासून संरक्षण करेल.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांविरोधात राज्य ...
नॉमिनी बद्दलचा हा नवीन नियम ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. जर एखाद्या ठेवीदाराचा मृत्यू झाला तर त्याने नॉमिनेट केलेल्या व्यक्तीला पैसे किंवा मालमत्ता सहज मिळू शकते. पूर्वी ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती, परंतु आता ती सोपी करण्यात आली आहे.विशेषत: ज्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य आहेत, त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा आहे.






