Saturday, October 25, 2025
Happy Diwali

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट!  मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली होती. या व्यक्तीच्या अंगावर तब्बल १७ वार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा खून अत्यंत निर्दयीपणे केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना दोडामार्ग तिलारी वसाहतीच्या पुलाजवळ एक नंबर प्लेट नसलेली, रक्ताने माखलेली कार सापडली. त्यामुळे या कारचा आणि साळीस्ते येथे सापडलेल्या मृतदेहाचा काहीतरी संबंध असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बेंगलोर येथील दोन व्यक्तींना बोलावून घेतले. मात्र मृतदेहावर झालेल्या वारांमुळे चेहरा ओळखता न आल्याने खात्रीशीर ओळख पटू शकली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतदेहाची ओळख श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर, कर्नाटक) अशी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती डॉक्टर पेशातील असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या खुनामागील कारण काय? खून कुठे झाला ? आणि दोडामार्गमध्ये सापडलेली ती कार याचा या घटनेशी नेमका काय संबंध आहे ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून तपासाची गुप्तता पाळली जात असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ओळख पटल्यानंतर पोलिसांनी एक पथक श्रीनिवास रेड्डी यांच्या घराच्या दिशेने रवाना केले असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा