मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या डागडुजी आणि दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी 'ब्लॉक' (Block) घेतला जातो. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) उपनगरीय मार्गांवर उद्या, रविवारी 'मेगा ब्लॉक' जाहीर करण्यात आला आहे. माटुंगा आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येत आहे. या कालावधीत रेल्वेमार्गांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल संबंधित कामे करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) मुंबई विभागातही दुरुस्तीची कामे होणार आहेत. पश्चिम रेल्वेवर आज, शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र, रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याची आणि होणाऱ्या गैरसोयीसाठी तयारी ठेवण्याची विनंती केली आहे.
मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे. मात्र, याच उकाड्यादरम्यान पुण्यासह ...
असं असणार आहे वेळापत्रक!
मध्य रेल्वे मेगा ब्लॉक वेळापत्रक: रविवारचा प्रवास करण्यापूर्वी वाचा
मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागामध्ये रविवारी (Sunday) घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे (Mega Block) लोकल प्रवासाच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल झाले आहेत. प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी या बदलांचा विचार करणे आवश्यक आहे.
१. माटुंगा ते मुलुंड (अप आणि डाऊन जलद मार्ग):
सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंतडाऊन जलद मार्गावर बदल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकातून डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. या गाड्या मुलुंडपर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील आणि ठाण्यानंतर पुन्हा जलद मार्गावर धावतील. या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी साधारण १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. अप जलद मार्गावर बदल ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्याही मुलुंडपासून माटुंगापर्यंत स्लो लाईनवर धावतील आणि त्या १५ ते २० मिनिटे उशिराने पोहोचतील.
२. ठाणे – वाशी / नेरुळ (ट्रान्स हार्बर लाईन)
सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंतपरिणामया काळात ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा पूर्णपणे बंद (Cancelled) राहील. ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या आणि पनवेलकडून ठाण्याकडे येणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत, सहकार्य करण्याची विनंती केली आहे.






