Saturday, October 25, 2025
Happy Diwali

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबाराचे आयोजन केले आहे. नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री. राणे यांचा जनता दरबार २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता चिपळूण येथील सहकार भवन, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता देवरूख येथे मराठा हॉल (भाजपा तालुका कार्यालयजवळ), ३० ऑक्टोबर रोजी ११ वाजता डी.पी.डी.सी. सभागृह (जिल्हाधिकारी कार्यालय) रत्नागिरी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे द. रत्‍नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >