Saturday, October 25, 2025
Happy Diwali

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागला. आपल्या हटके स्टाईल आणि जबरदस्त अभिनयाने त्याने Millennial पिढीपासून ते Gen Z पर्यंतच्या चाहत्यांना वेड लावले आहे.

आता याच चाहत्यांसाठी शाहरुख खानने एक मोठी घोषणा केली आहे. येत्या २ नोव्हेंबर २०२५ रोजी किंग खान आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास निमित्ताने त्याने चाहत्यांसाठी एका विशेष फिल्म फेस्टिवलचे आयोजन केले आहे.

शाहरुख खानने काय सांगितले?

शाहरुख खानने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. त्याने लिहिले आहे की, "माझे काही चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. त्या चित्रपटांमध्ये मी जसा होतो, तसाच आजही आहे... फक्त आता केसांची स्टाईल थोडी बदलली आहे आणि आता मी आणखी छान दिसत आहे!"

'शाहरुख खान फिल्म फेस्टिवल' येत्या ३१ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. भारतातील काही निवडक चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित होतील.

हे सुपरहिट चित्रपट पुन्हा पाहायला मिळणार

या फिल्म फेस्टिवलमध्ये शाहरुख खानच्या 'एव्हरग्रीन' चित्रपटांचा समावेश आहे. चाहत्यांना मै हू ना, चेन्नई एक्सप्रेस, दिल से, कभी हा कभी ना, जवान, ओम शांती ओम हे चित्रपट मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहता येणार आहेत.

यामुळे किंग खानच्या चाहत्यांना त्याचा वाढदिवस चित्रपटगृहात मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा