Saturday, October 25, 2025
Happy Diwali

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई  : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो प्रवासातील ही झोप महागात पडू शकते.गाडीने प्रवास म्हटलं की डुलकी किंवा झोप आलीच. ऑफिससाठी दररोज प्रवास करणारे कितीतरी प्रवासी प्रवासात झोपतात. पण मेट्रोमध्ये अशी झोप काढणं तुम्हाला महागात पडू शकतं. अशी एक मेट्रो आहे ज्यात तुम्हाला झोपण्यास मनाई आहे. चुकूनही तुम्ही झोपलात तर तुम्हाला दंड बसू शकतो. थोडाथोडका नव्हे तर हजारो रुपयांचा दंड भरावा लागतो. मेट्रोमध्ये प्रवास करताना जमिनीवर बसणं, आडवं होणं, गेटसमोर उभं राहणं किंवा बसणं, सीटवर पाय वर करून बसणं, सीट झोपणं यास सक्त मनाई आहे. हा नियम दुबई मेट्रोचा आहे. अलिकडेच व्हायरल झालेल्या एका प्रवाशाच्या पोस्टनंतर, दुबई मेट्रोचे हे नियम पुन्हा चर्चेत आले आहेत. दुबई मेट्रोच्या नियमांनुसार, प्रवास करताना जर तुम्ही जमिनीवर बसलात किंवा झोपलात तर तुम्हाला १०० ते ३०० दिरहमपर्यंत दंड होऊ शकतो. भारतीय रुपयात ही रक्कम सुमारे २,५०० ते ७,५०० रुपये आहे.

Comments
Add Comment