Saturday, October 25, 2025
Happy Diwali

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत बनकरला पकडण्यात यश आलं. पोलिसांनी पुण्यातून प्रशांत बनकर याला अटक केले असून प्रमुख आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा अजूनही फरार आहे. पण पोलिसांना गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन सापडलं आहे.

बदनेचा पोलीस पंढरपुरात शोध घेत आहेत. निलंबित पीएसआय बदने याचं शेवटचं लोकेशन पंढरपुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पंढरपूर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. काल रात्री गोपाल बदने याचे लोकेशन पंढरपुरात होते. गोपाळ बदनेने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने सुसाईड नोटमध्ये केला होता.

आरोपी प्रशांत बनकरला अटक

प्रशांत बनकर याला काल पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रशांत हा आपल्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता. प्रशांत बनकर हा पीडित डॉक्टर तरुणी राहत असलेल्या बिल्डिंग मालकाचा मुलगा आहे. त्या नोटमध्ये तिने प्रशांत बनकर याचंही नाव लिहिलं होत. प्रशांत बनकरने आपल्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >