Saturday, October 25, 2025
Happy Diwali

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काही महिन्यांपासून सुरू असलेले पुलावरील काम थांबल्याने दिवाळीच्या काळात नागरिकांना दिलासा देत हा पूल काही दिवसांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) सकाळपासून हा पूल बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचे संकट कायम राहणार आहे.

महामेट्रोच्या डेक्कन स्थानकाला नारायण पेठ परिसराशी जोडणारा पादचारी पूल बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात अवजड लोखंडी संरचना बसवण्यात येत असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव भिडे पूल पूर्णतः बंद ठेवला आहे. दिवाळीच्या काळात लक्ष्मी रस्ता आणि मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन हा पूल ११ ऑक्टोबरपासून सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत तात्पुरता खुला करण्यात आला होता. परंतु आता पुन्हा काम गतीने सुरू झाल्याने तो डिसेंबरअखेरपर्यंत बंद राहणार आहे. नव्या वर्षातच भिडे पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला होईल. तोपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रोच्यावतीने करण्यात आले आहे.

पर्यायी मार्ग : भिडे पूल बंद असताना वाहनचालकांनी संभाजी पूल, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल आणि काकासाहेब गाडगीळ पूल या पुलांचा वापर करावा. प्रशासनाने या मार्गांवरील वाहतूक सुरळीत राहावी म्हणून विशेष व्यवस्था केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >