Saturday, October 25, 2025
Happy Diwali

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान विष्णूंचा शेवटचा आणि ९वा अवतार मानलं जातं. आज जगभरात असे अनेक देश आहेत जिथे बुद्धांच्या मोठ्या मूर्ती उभारल्या जातात आणि देव म्हणून त्यांची पूजा केली जाते. चीन, जपान, श्रीलंका, दक्षिण कोरिया, बर्मा, थायलंड ही बौद्ध राष्ट्रे आहेत. त्यापैकी थायलंडमधील बँकॉक शहरातील वाट ट्रायमिट येथे जगातील सर्वात मोठी सोन्याची मूर्ती “सुवर्ण बुद्ध” पाहायला मिळते. ही मूर्ती सुमारे ३ मीटर उंच असून, वजन अंदाजे ५,५०० किलोग्रॅम (१२,१२५ पौंड) आहे.

या मूर्तीचे सर्वात खास वैशिष्ट्य अगदी बुद्धाच्या केसांच्या वरच्या गाठीपासून पायापर्यंत पूर्ण मूर्ती सोन्याने बनवलेली आहे. बांधकामासाठी सुमारे ८३ टक्के शुद्ध सोने वापरण्यात आले आहे. मूर्तीतल्या विविध भागांमध्ये सोन्याची शुद्धता वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ, बुद्धाचे शरीर अंदाजे ४० टक्के शुद्ध सोन्याचे असून, केस आणि वरच्या गाठीचे भाग अंदाजे ९९ टक्के शुद्ध सोन्याने बनवलेले आहेत.

सोन्याच्या सध्याच्या किमतीनुसार सुवर्ण बुद्धाची किंमत $४८० दशलक्ष पेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. शिवाय, सुवर्ण बुद्धाच्या पुतळ्याची रचना विशिष्ट बौद्ध परंपरेचे प्रतिबिंबित करते, ज्यामध्ये बुद्ध भूमिस्पर्श मुद्रेत (बसलेल्या मुद्रा) बसलेले आहेत. हे मुद्रा ज्ञान, वासना आणि अज्ञानावर विजयाचे प्रतीक आहे.

Comments
Add Comment