Saturday, October 25, 2025
Happy Diwali

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात येणाऱ्या होमिओपथी, आयुर्वेद आणि युनानी या विषयांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीची यादी २५ ऑक्टोबर २०२५ ला जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये जावे लागणार आहे.

या फेरीच्या यादीमध्ये ४२८५ जागा रिक्त असून आतापर्यंत झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये राज्य कोट्यातील १३,४९५ पैकी ९२१० जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. "बीएएमएस" या अभ्यासक्रमासाठी राज्यातील २२ सरकारी आणि ११७ खासगी अशा एकूण १३९ महाविद्यालयांमध्ये राज्य कोट्यासाठी ९४०६ जागा उपलब्ध होत्या. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये सरकारी महाविद्यालयांमधील १५२८ पैकी १२२४ जागांवर आणि खासगी महाविद्यालयांमधील ७८७८ जागांपैकी ५७०७ अशा एकूण ६९३१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. आता सरकारी महाविद्यालयांमधील ३०४ आणि खासगी महाविद्यालयांमधील २१७१ अशा २५७५ जागा बीएएमएस अभ्यासक्रमासाठी शिल्लक आहेत.

बीएचएमएस या अभ्यासक्रमासाठी राज्यातील १ सरकारी आणि ५४ खासगी अशा ५५ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यातील एका सरकारी महाविद्यालयात राज्य कोट्यासाठी उपलब्ध असलेल्या ५४ पैकी २३ जागा भरल्या असून ३१ जागा शिल्लक आहेत. खासगी महाविद्यालयांमधील ३६८६ पैकी १९४० जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. आणि १७४६ जागा शिल्लक आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या एकूण १७७७ जागा तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध आहेत.

बीयूएमएस अभ्यासक्रमाची तीन सरकारी आणि चार खासगी महाविद्यालये आहेत. या ७ महाविद्यालयांमध्ये मिळून ३४९ जागा आहेत. त्यापैकी १५३ जागा सरकारी महाविद्यालयांमध्ये आहेत. तसेच, १९६ खासगी महाविद्यालयांमध्ये आहेत. या जागांपैकी १४२ सरकारी आणि १७४ खासगी जागांवर दुसऱ्या फेरीपर्यंत प्रवेश पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या फेरीसाठी सरकारी महाविद्यालयांमधील ११ आणि खासगी महाविद्यालयांमधील २२ अशा ३३ जागा शिल्लक आहेत.

Comments
Add Comment