मोहित सोमण: टाटा समुहातील वाद थांबत नसताना एक नवे नाट्यमय वळण समुहाला लागले आहे. प्रामुख्याने मेहली मिस्त्री यांनी स्वतः सह सगळ्याच सरसकट संचालक मंडळाची पुर्ननियुक्तीची अट टाटा समुहाला २१ ऑक्टोबर रोजी टाकली होती. यावर टा टा समुहातील वादंग सुरू असताना अचानक टाटा समुहाने संचालक मेहली मिस्त्री यांना संचालक मंडळाचे आजीवन सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. अर्थात यावर मेस्त्री यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांना मान्य केल्या स एकूणच टाटा मेस्त्री वादावर पडदा पडू शकतो. टाटा सन्समध्ये एकूण ५१% भागभांडवल दोराबजी टाटा ट्रस्ट, व रतन टाटा ट्रस्ट यांच्याकडे आहे. टाटांकडे बहुतांश शेअर (भागभांडवल) असले तरी शापोरजी पालोनजी समूहाचे सर्वेसर्वा मेहली मिस्त्री यांच्याक डेही टाटा ट्रस्टमध्ये १८% भागभांडवल आहे जे निर्णय प्रक्रियेत अत्यंत प्रभावशाली मानले जाते. वादातील असलेली संचालक विजय सिंह यांच्या नियुक्तीसह इतर सर्व संचालकांची फेर नियुक्ती करावी असा प्रस्ताव त्यांनी मेलद्वारे टाटा समुहाला दिला होता. संचाल क वेणू श्रीनिवासन यांची नुकतीच पुनः नियुक्ती झाली होती. त्यांच्यासह उर्वरित संचालक नव्या प्रस्तावानुसार आजीवन संचालक मंडळाचे सदस्य होऊ शकतील. अर्थात मिस्त्री व टाटा गटातील अविश्वास व मतभेदांमुळे मिस्त्री यांनी टाटा समुहाला ही नवी पुर्ननियु क्तीची गळ घातली. त्यामुळे पेचप्रसंग समुहासमोर उभा झाला होता.
यापूर्वी सेबीने कंपनीला टाटा सन्स सूचीबद्ध करण्यासाठी दिलेली मुदत आता ओलांडली असली तरी यावर ठोस निर्णय झाला नव्हता. परंतु सेबीने कामकाज सुरू ठेवण्यास हिरवा कंदील दाखवला असताना मेहली मिस्त्री व त्यांच्या समर्थकांनी लवकरात लवकर कंपनी सूचीबद्ध करावी यासाठी शिफारस केली होती. मेस्त्री समुहाला आपले भागभांडवल विकत त्यातून तरलता (Liquidity) निधी उभा करून आपले कर्ज थकीत देणी चुकती करायची होती. मेस्त्री यांनी अट टाकलेल्या वृत्तावर या प्रकरणाची माहिती असले ल्या लोकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की मिस्त्री यांच्या संमतीसोबत एक अट होती, भविष्यातील सर्व विश्वस्त नूतनीकरण एकमताने मंजूर केले जावे आणि जर भविष्यात पुनर्नियुक्तीसाठी कोणताही ठराव एकमताने झाला नाही तर त्यांची मान्यता मागे घेतली जाईल. अशी पहिली नूतनीकरणाची अट मिस्त्री यांची स्वतःची असेल. मिस्त्रींनी घातलेली अट त्यांना नूतनीकरण न देण्याचा आणि त्याद्वारे त्यांना ट्रस्टमधून काढून टाकण्याचा कोणताही निर्णय घेण्यास प्रतिबंध करते.
उपलब्ध माहितीनुसार, नेमक्या शब्दात,' शंका टाळण्यासाठी, जर कोणत्याही विश्वस्ताने वेणू श्रीनिवासन यांची पुनर्नियुक्ती करण्याचा हा ठराव किंवा इतर सर्व विश्वस्तांसाठी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर समान एकमताने ठराव मंजूर न करण्याचा निर्णय घेतला, त र अशा परिस्थितीत, मी वेणू श्रीनिवासन यांच्या पुनर्नियुक्तीसाठी माझी औपचारिक मान्यता देत नाही. हे सांगण्याची गरज नाही की, अशी परिस्थिती उद्भवेल अशी मला अपेक्षा नाही' असे मेहलीच्या उत्तरात मेलमध्ये म्हटले असल्याचे त्यांनी म्हटले होते. मागील म हिन्यात मिस्त्री, डेरियस खंबाटा, प्रमीत झवेरी आणि जहांगीर एचसी जहांगीर या चार विश्वस्तांनी विजय सिंह यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केल्यामुळे त्यांना टाटा सन्सच्या संचालक मंडळातून बाहेर पडावे लागले होते. या वादामुळे हे प्रकरणात स्वतः सरकारने दख ल दिली होती. नोएल टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. सरकारने समूहाला हा वाद सार्वजनिक न करता आपापसात सोडवण्याचा सल्ला दिला होता. तरी अ सले असताना दोन्ही मिस्त्री व टाटा गटात टोकाचे मतभेद होते. आता मात्र सर्वस्वी हितासाठी कंपनीने मेस्त्री यांना आजीवन सदस्यत्वाची ऑफर दिल्याचे समजत आहे.
टाटा सन्सचे प्रमुख भागधारक असलेल्या टाटा ट्रस्ट्सने त्यांच्या तीन प्रमुख परोपकारी संस्था असलेल्या सर रतन टाटा ट्रस्ट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि बाई हिराबाई जमशेदजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशनसाठी मेहली मिस्त्री यांची विश्वस्त म्हणून पुन र्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव त्यांच्या विश्वस्तांमध्ये प्रसारित केला आहे. या पुनर्नियुक्तीमुळे मिस्त्री यांना आजीवन विश्वस्त दर्जा मिळू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा ट्रस्ट्सने औपचारिकता म्हणून मिस्त्री यांची विश्वस्त म्हणून पुनर्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पाठवलेला प्रस्ताव जर तो एकमताने मंजूर झाला तर ऑक्टोबर २०२४ रोजी विश्वस्त नियुक्ती करण्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असे झाल्यास ते आजीवन विश्वस्त बनतील
टाटा ट्रस्ट्सचे मुख्य कार्यकारी सिद्धार्थ शर्मा यांनी आज इतर विश्वस्तांना एक प्रस्ताव पाठवला आहे, ज्यामध्ये मिस्त्री यांची सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट (त्या काळात टाटा सन्समधील डझनभर ट्रस्टच्या ६६.६% पैकी ५२% इतकी मालकी अ सलेले प्रमुख ट्रस्ट) मध्ये पुनर्नियुक्ती करण्याची मागणी केली आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिली.दरम्यान सूत्राने असेही म्हटले की, 'विश्वस्तांमध्ये सध्या शांततापूर्ण वातावरण असल्याने मिस्त्री यांची पुनर्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव केवळ एक अधिकृत औपचारिकता आहे.' अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया कंपनीकडून दिली गेलेली नाही.






