Friday, October 24, 2025
Happy Diwali

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेली ही मेट्रो मुंबईची पहिली पूर्णपणे जमिनीखालून (Underground) जाणारी आहे. ही मेट्रो आरे कॉलनी ते बीकेसी पर्यंत जाते आणि ती विमानतळाला (Airport) जोडते. पण विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या बॅग्स घेऊन पायऱ्यांवरून खाली उतरावे लागते, कारण उतरण्यासाठी सरकते जिने नाहीत. स्टेशनच्या बाहेरही चांगले रस्ते (पेंवमेंट) नाहीत.

अनेक मुंबईकरांनी देखिल त्यांचे वाईट अनुभव सोशल मीडियावर सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, त्याला २५ किलोची बॅग स्वतः खाली घेऊन यावी लागली. दुसऱ्या एका युजरने गमतीत म्हटले की, "आपला देश खाली उतरण्यावर विश्वास ठेवत नाही." मात्र, काही लोकांनी मेट्रोचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, अवजड सामानासाठी लिफ्ट आहेत, ज्या अजूनही बसवण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना आशा आहे की, मेट्रोचे अधिकारी लोकांचा हा त्रास लवकरच दूर करतील.

Comments
Add Comment