Friday, October 24, 2025
Happy Diwali

महादेवाच्या पिंडीवर अवतरली नागदेवता! बघ्यांची उसळली गर्दी

महादेवाच्या पिंडीवर अवतरली नागदेवता! बघ्यांची उसळली गर्दी

वाडा: तालुक्यातील दुपारेपाडा या गावातील श्री गणेश मंदिरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास या मंदिरातील श्री महादेवाच्या पिंडीवर नागदेवता अवतरली होती ही नागदेवता पिंडीभोवती विळखा घालून दोन अडीच तास असल्याने हे चित्र पाहण्यासाठी मंदिरात भक्तांनी एकच गर्दी केली होती.

दुपारे पाडा या गावात श्री गणेशाचे मंदिर आहे.या मंदिरात गणेशाच्या मूर्ती बरोबर श्री महादेवाची पिंड सुध्दा आहे.या पिंडीवर बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक नाग (सर्प)दिसून आला.हा नागराज सुमारे दोन ते अडीच तास पिंडीला विळखा घालून होता.याचवेळी मंदिरात हरिपाठ चालु होता. पिंडीला विळखा घातलेला असल्याचे एका भक्तांच्या निदर्शनास आले आणि त्यानंतर ही माहिती गावात पसरली.

गावक-यांनी मंदिराकडे धाव घेतली त्यानंतर सोशल मिडीयावर हे व्हायरल होताच हे पाहण्यासाठी आजुबाजूच्या कोने, शिरीष पाडा या गावातील नागरिक ही मंदिरात दाखल झाले त्यामुळे मंदिरात एकच गर्दी झाली होती.

अखेर सर्पमित्रांनी सापाला पकडून वनविभागाच्या अधिका-यांशी बोलून जंगलात सोडून देण्यात आले. ही घटना परिसरात कुतूहलाचा विषय ठरली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा