Friday, October 24, 2025
Happy Diwali

Satara Crime: CM फडणवीसांची ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’! साताऱ्यातील बलात्कारी PSI गोपाल बदने निलंबित, SP दोशी म्हणाले, “कायद्यापुढे...

Satara Crime: CM फडणवीसांची ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’! साताऱ्यातील बलात्कारी PSI गोपाल बदने निलंबित, SP दोशी म्हणाले, “कायद्यापुढे...

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या (Suicide) प्रकरणाने आता अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे. मृत डॉक्टरने आपल्या हातावरच आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले आहे, ज्यात दोन व्यक्तींवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वतः सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची सविस्तर माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यांनी संबंधित आरोपी पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित (Immediately Suspend) करण्याचे आदेश दिले, तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पोलीस अधिकारी गोपाळ बदने याचे निलंबन केले आहे.

SP तुषार दोषीं काय म्हणाले?

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या आणि सुसाईड नोटमधील आरोपांवर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी स्वतः माहिती दिली आहे. एसपी तुषार दोषी म्हणाले की, "आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे." त्यांनी आरोपींची माहिती दिली. आरोपीचे नाव पीएसआय (PSI) गोपाल बदने असून, तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. दुसरा आरोपी प्रशांत बनकर असून, तो पोलीस नसून सामान्य नागरिक आहे. दोषी यांनी सांगितले की, "आम्ही गोपाल बदने याला निलंबित करत आहोत." तसेच, "या दोघांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलेले आहेत." पोलीस अधीक्षकांनी नमूद केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. "आरोपींना तात्काळ अटक करायची आणि जी काही कारवाई आहे ती करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही तपास करत आहोत," अशी माहिती तुषार दोषी यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

सातारा (Satara Crime News) जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण लागले आहे. मृत डॉक्टरच्या हातावर आढळलेल्या सुसाईड नोटमुळे (Suicide Note) हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार (Rape) झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. यामध्ये त्यांनी थेट पोलीस निरीक्षक गोपाल बदने याचे नाव लिहिले असून, बदनेने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, पोलीस प्रशांत बनकर यानेही आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादामध्ये अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांची अंतर्गत चौकशी सुरू होती, असेही समजते. मात्र, हातावर थेट सुसाईड नोट लिहून, त्यात पोलिसाकडूनच बलात्कार झाल्याचे नमूद करत आत्महत्या केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, साताऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय?

सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan) उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे (Suicide) उघडकीस आलेल्या प्रकरणात, त्यांच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमधील मजकूर अत्यंत गंभीर आहे. या नोटमध्ये महिला डॉक्टरने पोलिसांविरोधात थेट आरोप केले आहेत. मृत डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे की, "पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला." तर, पोलीस प्रशांत बनकर याने आपल्याला सतत मानसिक त्रास दिला. या अत्यंत गंभीर आरोपांमुळे, पोलीस आणि आरोग्य विभाग वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >