Friday, October 24, 2025
Happy Diwali

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड असा सामना रंगला. ज्यात भारताने ५३ धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मृती मानधनाने धमाकेदार फटकेबाजी करत शतक पूर्ण केले. स्मृतीचे हे एकदिवसीय सामन्यातील आतापर्यंतचे १४वे शतक ठरले आहे.

स्मृतीला यावेळी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारल्यावर तिने आपले मनोगत व्यक्त करताना आपली सहकारी प्रतिका रावलचाही पुरस्कारावर तेवढाच हक्क आहे, असे सांगितले. ज्यामुळे तिच्या या एका वाक्यात तिने पुन्हा एकदा सर्वांच्या ह्रदयाला हात घातला. यावेळी स्मृती म्हणाली की, "भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला, याचा सर्वात जास्त आनंद आहे. गेले तीन सामने आमच्यासाठी चांगले गेले नव्हते. चांगले क्रिकेट खेळूनही आम्हाला विजय मिळवता येत नव्हता. पण या सामन्यात मात्र आम्ही चांगली कामगिरी करून विजयी ठरलो. मी या विजयासाठी जेवढी पात्र आहे, तेवढीच प्रतिका रावलही आहे."

स्मृतीच्या फटेबाजीमुळे भारताने सामन्याला जोरदार सुरुवात केली होती. ज्यामुळे क्रिकेटप्रेमींना सामना जिंकण्याची चिन्हे दिसत होती. स्मृतीला गेल्या दोन सामन्यांमध्ये शतकाने हुलकावणी दिली होती. स्मृतीन अनुक्रमे ८० आणि ८८ धावा केल्या होत्या. पण या सामन्यात मात्र स्मृतीने ९५ चेंडूंत १०९ धावांची खेळी करत आपले शतक पूर्ण केले. ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते. तर क्रिकेट एकदिवसीय सामन्यांत भागीदारीतून सर्वाधिक धावा करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या एकत्र यादीत स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >