प्रतिनिधी:जाहिरात क्षेत्राचे 'ॲडगुरू' म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ जाहिरात तज्ञ पियुष पांडे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यामुळे कला व जाहिरात क्षेत्रात शोककळा पसरली आहे. भारतीय जाहिरात क्षेत्राला पालटून टाकणाऱ्या पांडे यांच्या निधना नंतर अनेक मान्यवरांनी आपली संवेदना व्यक्त करत पोस्टवर श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क मुंबई येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,'श्री पि युष पांडे जी त्यांच्या सर्जनशीलतेसाठी प्रशंसनीय होते. त्यांनी जाहिरात आणि संप्रेषणाच्या जगात एक अविस्मरणीय योगदान दिले. गेल्या काही वर्षांत आमच्यातील संवाद मी मनापासून जपून ठेवेन. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबा आणि चाहत्यांसोबत माझे संवेदना आहेत. ओम शांती.' अशी भावना एक्सवर व्यक्त केली आहे.
पांडे यांचे निकटवर्तीय मित्र जवळचा मित्र सुहेल सेठ यांनी एक्सवर पोस्टमध्ये, 'माझा सर्वात प्रिय मित्र पियुष पांडे ज्या प्रतिभावान व्यक्तीचा होता त्याच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे आणि मी हताश झालो आहे. भारताने केवळ एक महान जाहिरात मन गमावले नाही तर एक खरा देशभक्त आणि एक उत्तम, उत्तम गृहस्थ गमावला आहे. आता स्वर्ग मिले सूर मेरा तुम्हारा या गाण्यावर नाचेल.' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पियुष पांडे यांनी ८०,९० च्या दशकात जाहिरात क्षेत्रात क्रांती घडवली होती. त्यांनी पारंपरिक जाहिरातीपासून फारकत घेत माहितीपूर्ण व संवेदनशील वैविध्यपूर्ण जाहिराती अँड एजन्सीमार्फत बनवल्या.करमणूकीत संदेश देताना लक्षात राहतील अशा जाहिराती बनवणे हा त्यांचा लौकिक होता. Ohilvy India या जाहिरात एजन्सीमार्फत त्यांनी चार दशके जाहिरात व मल्टीमिडिया क्षेत्रात आपले अधिराज्य गाजवले होते. क्रिकेटपटू, चहाचा स्वाद घेणारे आणि बांधकाम कामगार म्हणून काही काळ काम केल्यानंतर पांडे १९८ २ मध्ये ओगिल्वीमध्ये (Ogilvy India) रूजू झाले होते. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी जाहिरातींच्या दुनियेत प्रवेश केला होता ते त्यांनी कायमचे पलटवले. त्यांच्या प्रसिद्ध जाहिरातीपैकी एशियन पेंट्स ("हर खुशी में रंग लाये"), कॅडबरी ("कुछ खास है"), फेविकॉल आणि हच सारख्या ब्रँडसाठी केलेल्या जाहिरातीतून सामाजिक संदर्भ लक्षात घेता ते सांस्कृतिक परिवर्तन ते त्यांनी जाहिरातीतून दर्शविले होते.२०२३ मध्ये सल्लागार भूमिका घेण्यासाठी ओगिल्वी इंडियाच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते.
विशेष बाब म्हणजे,प्रसिद्धी असूनही पियुष पांडे स्वतःला वेगळे मानण्यापेक्षा ससंघाचा भाग म्हणून मानत होते. एक उत्साही क्रिकेटपटू म्हणून त्यांनी जाहिरातींची तुलना नेहमी सांघिक खेळाशी केली. 'ब्रायन लारा एकटा वेस्ट इंडिजसाठी जिंकू शकत नाही, तो एक दा म्हणाला होता. "मग मी कोण?' हा त्यांचा डायलॉग विशेष गाजला होता.त्याच्या नेतृत्वाखाली, ओगिल्वी इंडिया जगातील सर्वात मोठ्या सन्मानित एजन्सींपैकी एक बनली आहे. सर्जनशील नेत्यांकडून आगामी पिढ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र बनली आहे. २०१८ मध्ये, पांडे आणि भाऊ चित्रपट निर्माते प्रसून पांडे, कान्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटीमध्ये प्रतिष्ठित लायन ऑफ सेंट मार्क मिळवणारे पहिले आशियाई बनले होते.भारतीय कथाकथनाला जागतिक उंचीवर नेणाऱ्या त्यांच्या आयुष्यभराच्या कामाची पावती त्यातून त्यांनी मिळवली.
जाहिरातींनी केवळ मनांना प्रभावित न करता हृदयांना स्पर्श केला पाहिजे या खासियत व विश्वासासाठी ओळखले जाणारे पांडे भावना आणि सत्यात रुजलेल्या सर्जनशीलतेचे समर्थन करत होते. ते कायम तंत्रज्ञानपेक्षाही गोष्टी व मूल्यांना प्राधान्य देत असत.जाहिरात तज्ञ म्हणून बोलताना, 'कुठेतरी, तुम्हाला हृदयांना स्पर्श करावा लागेल.' असे ते म्हणत असत.भारताच्या जाहिरातींच्या क्षेत्रात उत्क्रांती होत असतानाही, पांडे यांचा प्रभाव कायम राहिला. विशेष उल्लेख म्हणजे त भारतातील सर्वात संस्मरणीय राजकीय घोषणांपैकी एक - 'अब की बार, मोदी सरकार' हे घोषणा वाक्य तयार करण्यास मदत केली होती. त्यांचा जाहिरात क्षेत्रातील प्रवास अनेक कथाकारांच्या स्थानिक, भावनिक आणि वास्तविकतेमध्ये प्रामाणिकपणा शोधण्यासाठी प्रेरणा देत राहील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.






