मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४ ऑक्टोबर, २०२५ ते १ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत असणार आहे. नॉन-इंटरलॉकिंग नंतरची कामे पूर्ण करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर डे ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे कर्जत-खोपोली मार्गावरील उपनगरीय लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. ज्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. २४ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजून २० मिनिटांपासून दुपारी १ वाजून २० मिनिटांपर्यंत दोन तास ब्लॉक असणार आहे. तर २५ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबर सकाळी ११ वाजून २० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असा साडेचार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या ...
ब्लॉकच्या कालावधीत कर्जत ते खोपोली दरम्यान कोणतीही उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध असणार नाही. त्यामुळे कर्जत वरून खोपोलीला जाणारी दुपारी १२ वाजताची आणि १ वाजून १५ मिनिटांची लोकल बंद राहणार आहे. तर खोपोलीहून कर्जतला येणारी सकाळी ११ वाजून २० मिनिटांची आणि दुपारी १२ वाजून ४० मिनिटांची लोकल बंद राहणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासावे आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.






