Thursday, November 13, 2025

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर तर भाजपाने एका जागेवर विजय मिळवला. विशेष म्हणजे भाजपाचा हा विजय क्रॉस व्होटिंगमुळे झाला. भाजपा उमेदवार सत शर्मा यांना ३२ मते पडली तर नॅशनल कॉन्फरन्सच्या इमरान डार यांना केवळ २२ मते मिळाली. राज्यसभा निवडणुकीत केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरातील ८६ आमदारांनी मतदान केले. आम आदमी पक्षाचे आमदार मेहराज मलिक सध्या अटकेत आहेत. त्यांनी मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानात सहभाग घेतला. दुपारी ४ वाजता मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात झाली.

मतमोजणीत सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने राज्यसभेच्या ३ जागा जिंकल्या. या निकालावर पक्षाने निवेदन जारी करत म्हटलं की, चौधरी मोहम्मद रमजान यांनी पहिली जागा, सज्जाद किचलू यांना दुसऱ्या जागेसाठी विजयी घोषित केले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार जी.एस ओबेरॉय जे शम्मी ओबेरॉय नावाने ओळखले जातात. ते राज्यसभेच्या तिसऱ्या जागेवर विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे चौथ्या जागेवर भाजपाचे नेते सत शर्मा यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या इमरान डार यांचा पराभव करून विजय मिळवला

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा