नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली. मोदींनी यावेळी सांगितले की, ही फक्त नोकरी नाही, तर 'विकसित आणि आत्मनिर्भर भारत' बनवण्याच्या आपल्या प्रवासाचा हा एक उत्सव आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मोदी म्हणाले, "या वर्षीच्या दिवाळीने सर्वांच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणला आहे. सणासुदीच्या काळात सरकारी नोकरी मिळाल्याने तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दुप्पट आनंद मिळाला आहे." त्यांनी नवीन अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.
मोदींनी सांगितले की, गेल्या ११ वर्षांत ११ लाखांहून अधिक नोकरीची पत्रे दिली गेली आहेत. तसेच, त्यांनी 'प्रतिभा सेतू पोर्टल' सुरू करण्याची घोषणा केली, ज्यातून यूपीएससी परीक्षेत निवड न झालेल्या हुशार उमेदवारांना सरकारी आणि खासगी क्षेत्रात संधी मिळेल.






