मुंबई : मुंबईतील (Mumbai) काळाचौकी (Kalachowki) परिसरात आज, शुक्रवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर रस्त्यात एका तरुणाने एका तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर चाकू हल्ला (Knife Attack) केला. आस्था नर्सिंग होम (Aastha Nursing Home) परिसरात ही घटना घडली. तरुणी स्वतःला वाचवण्यासाठी नर्सिंग होममध्ये शिरली, परंतु आरोपीने तिथेच तिच्यावर हल्ला केला. आरोपी तरुणाने तरुणीवर चाकू हल्ला केल्यानंतर स्वतःचा गळा चिरून घेतला. यात हल्लेखोर तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सध्या पोलीस या दोघांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. तरुणाने हा हल्ला का केला? एकतर्फी प्रेमातून की त्यांच्यात प्रेमसंबंध होते? या आणि इतर अनेक अंगांनी पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
सातारा : सातारा (Satara Crime News) जिल्ह्यातील फलटण येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला ...
काळाचौकी घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ही घटना पोलीस स्टेशनपासून केवळ काही मिनिटांच्या अंतरावर घडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काळाचौकी पोलीस स्टेशनमधील सर्व वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून मृत तरुण आणि जखमी तरुणी यांची ओळख पटवण्याचे काम तसेच गुन्ह्यामागचा नेमका उद्देश शोधून काढण्याच्या दिशेने तपास युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे मुंबईसारख्या महानगरात महिला सुरक्षेचा प्रश्न (Women Safety) पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिवसाढवळ्या आणि सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या हिंसक घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.






