Friday, October 24, 2025
Happy Diwali

Ishwarpur Name : मोठी बातमी, 'इस्लामपूर नव्हे, ईश्वरपूर! अखेर केंद्र सरकारचा नामकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब, पत्र जारी

Ishwarpur Name : मोठी बातमी, 'इस्लामपूर नव्हे, ईश्वरपूर! अखेर केंद्र सरकारचा नामकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब, पत्र जारी

सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli District) इस्लामपूर (Islampur) शहराच्या नामकरणाच्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारची (Central Government) मान्यता मिळाली आहे. यामुळे आता इस्लामपूर शहराच्या नावात कायदेशीररित्या 'ईश्वरपूर' (Ishwarpur) असा बदल होणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी शेवटच्या दिवशी राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली होती. तेव्हा त्यांनी इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर (Ishwarpur) असे करणार असल्याचे सांगितले होते. या नामकरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. आता केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून (Survey of India) या नामकरणाला मान्यतेचे पत्र प्राप्त झाले आहे. या मान्यतेनंतर इस्लामपूर शहराचे नाव आता अधिकृतपणे 'ईश्वरपूर' (Ishwarpur) असे बदलण्यात येणार आहे.

४०-५० वर्षांची मागणी पूर्ण

या नामकरणाची मागणी गेल्या ४० ते ५० वर्षांपासून सातत्याने चर्चेत होती. पंत सबनीस (Pant Sabnis): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी चार-पाच दशकांपूर्वी शहराचे नामकरण 'ईश्वरपूर' करावे, अशी मागणी सर्वप्रथम केली होती. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी डिसेंबर १९८६ मध्ये इस्लामपूर येथील यल्लमा चौकात झालेल्या जाहीर सभेत प्रथमच व्यासपीठावरून 'इस्लामपूर नव्हे, तर हे ईश्वरपूर' असा उल्लेख केला होता. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही सभागृहात 'इस्लामपूर नव्हे, तर हे ईश्वरपूर' अशी घोषणा केली. मंत्रिमंडळाने या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता, ज्याला आता केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. शहराचे नामांतरण 'ईश्वरपूर' झाल्यानंतर यापुढे ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ यासह तालुका, जिल्हा आणि सर्वच शासकीय, निमशासकीय संस्था, व्यवसाय, उद्योग आणि इतर सर्व स्तरावर 'ईश्वरपूर' हेच नाव वापरले जाईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >